Monsoon 2022 Update | गुड न्यूज ! यावर्षी मान्सून येणार 5 दिवस आधीच, हवामान विभागाने वर्तवला अंदाज; महाराष्ट्रात 20 मेनंतर पावसाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Monsoon 2022 Update | पावसाचे आगमन हा सर्वांसाठीच उत्सुकतेचा विषय असतो. शेतकरी असो की सर्वसामान्य माणूस, दरवर्षी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता पावसाच्या आगमनाबाबत एक आनंदाची बातमी आली. कारण मान्सून वेगाने वाटचाल करत असून तो राज्यात लवकर येईल, असा अंदाज हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) वर्तवला आहे. (Monsoon 2022 Update)

 

हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, रविवारी अंदमानात मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो. यावर्षी पाच दिवस आधीच मान्सून अंदमानात पोहोचू शकतो. बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ शांत होताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले असून यामुळे मान्सूनचा मार्ग सोपा झाला आहे.

 

राज्यात मान्सूनचे आगमन 27 मे ते 2 जूनदरम्यान
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात 15 मे रोजीच मान्सूनचे आगमन होऊ शकते. बंगालच्या उपसागरात बुधवारी संध्याकाळी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी सुरू आहे. (Monsoon 2022 Update)

या वार्‍यांचा वेग किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमीटर आहे. या सर्व घडामोडींमुळे मान्सूनचे आगमन 5 दिवस आधीच होईल.
मान्सून केरळमध्ये 20 ते 26 मेपर्यंत दाखल होईल.
तसेच तळकोकणात मान्सून 27 मे ते 2 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

राज्यात 20 मेपर्यंत पावसाचा इशारा
20 मे पासून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 20 मे ते 26 मेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला.
हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात 27 जूननंतरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात आर्द्रता वाढल्याने हवामान ढगाळ राहील. यामुळे राज्यात तापमान कमी राहू शकते.

 

Web Title :- Monsoon 2022 Update | monsoon 2022 update will arrive early 5 days says imd

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा