Monsoon Arrival in Kerala | खुशखबर ! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, ‘या’ तारखेनंतर पुण्यात धडकणार – हवामान विभागाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Monsoon Arrival in Kerala | राज्यातील जनतेसाठी सकारात्मक बातमी आहे. मान्सून आज केरळमध्ये (Monsoon Arrival in Kerala) दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनाचे सर्व निकर्ष पूर्ण झाले आहेत. केरळमधील 60 टक्के पर्जन्यमापक केंद्रावर पावसाची (Rainfall) नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने India Meteorological Department (IMD) दिली आहे. दरवर्षी 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र, मान्सून काही काळ श्रीलंकेच्या (Sri Lanka) वेशीवर अडकला होता. त्यामुळे मान्सून केरळमध्ये येण्यास उशीर लागण्याची शक्यता होती. अखेर तो आज केरळमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, पुढच्या सात दिवसांत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Updates) दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

 

पुढील 7 दिवसांत महाराष्ट्रात
यावर्षी वेळेआधीचं मान्सून दाखल (Monsoon Arrival in Kerala) झाला आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. आज केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढील सात दिवसांत तळकोकणात आणि महाराष्ट्रात दाखल होत असतो. त्या अंजानुसार मान्सून महाराष्ट्रात 7 ते 8 जून पर्यंत दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

8 तारखेनंतर मान्सून पुण्यात
तळकोकणात मान्सून दाखल झाल्यानंतर तो मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि अन्य ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. सध्या राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. तसेच मुंबईच्या परिसरात देखील हलका पाऊस झाला आहे. (Pune Monsoon Updates)

 

लगेच मोठ्या पावसाची अपेक्षा ठेवणं चुकीचं
मान्सून आगमन जाहीर करताना भारतीय हवामान विभागाचे काही निकष असतात. ते निकष पूर्ण झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये बऱ्यापैकी सर्वत्र पाऊस झाल्यानं मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागानं जाहीर केलं. तसेच पुढच्या काही दिवसांमध्ये केरळच्या उत्तरेकडे परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे लगेच मोठ्या पावसाची अपेक्षा ठेवणं योग्य ठरणार नाही.

 

Web Title :- Monsoon Arrival in Kerala | monsoon arrives in kerala weather department information know about maharashtra pune monsoon updates

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा