पावसाळ्यात वाढतो ‘फ्लू’चा धोका, ‘या’ 5 गोष्टींनी वाढवा रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात फ्लू आणि संसर्गाचा धोका अधिक प्रमाणात वाढतो. या हंगामात खाण्यापिण्याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. कोणत्याही प्रकारचा संसर्ग किंवा विषाणूपासून बचाव करण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असणे देखील आवश्यक आहे. आपण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टी वाढवू शकता त्याबद्दल जाणून घेऊया.

गवती चहा – आपण गवती चहा या औषधी वनस्पती बद्दल क्वचितच ऐकले असेल. या वनस्पतीचे तेल रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप फायदेशीर मानले जाते. व्हायरल ताप आणि सर्दी-खोकल्यामध्ये देखील याचा वापर केल्यास फायदा होतो. याने पोट, आतडे आणि मूत्रमार्गात संक्रमण पासून त्वरित आराम मिळतो.

आले – रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणत्याही चमत्कारी औषधापेक्षा आले कमी नाही. त्यामध्ये उपस्थित अँटी मायक्रोबियल आणि अँटी फंगल घटक शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्कृष्ट आहेत. भाज्यांमध्ये टाकून खाण्याव्यतिरिक्त आपण याचा वापर रस, सूप आणि चटणीमध्ये देखील करू शकता.

हळद – हळदीतील अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी प्रभावी आहे. एक चमचा मिरपूड पावडर, एक चमचा हळद आणि एक चमचा सुंठ म्हणजेच कोरड्या आल्याची पावडर एका पाण्यात मिसळून गरम करा. हे पाणी उकळल्यानंतर जेव्हा अर्धे होईल तेव्हा ते थंड करून प्या.

तुळशी – तुळशीत अँटीबॉयोटिक गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात आणि शरीराला विषाणू विरूद्ध लढा देण्यास शक्ती देतात. एक चमचा लोंग पावडर आणि दहा ते पंधरा ताजे तुळशीची पाने एका लिटर पाण्यात इतक्या वेळेपर्यंत उकळवा की ते पाणी अर्धे होईल. यानंतर ते व्यवस्थित गाळून घ्या आणि थंड करून दर एका तासाने प्या. आपल्याला लवकरच व्हायरलपासून आराम मिळेल.

धणे – धणे हे आरोग्यासाठी खूप गुणकारी असते, त्यामुळे विषाणूजन्य तापासारख्या अनेक आजारांचा नाश होतो. धणेपासून बनवलेल्या चहाने विषाणूजन्य ताप दूर होतो. हे विषाणूजन्य तापासाठी एक प्रभावी औषध म्हणून काम करते. पावसाळ्यात तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी हा चहा प्यायला पाहिजे.