रोगप्रतिकारशक्ती होईल कमी, पावसाळ्यात चुकूनही करू नका ’या’ 4 पदार्थांचे सेवन, वेळीच सावध व्हा

पोलीसनामा ऑनलाइन – रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्ही कोरोनाशी दोन हात करू शकता. मात्र, पावसाळ्यात काही चुकीच्या सवयींमुळे अनेकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली दिसून येते. अहारातील चुकीच्या सवयींमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यास कोरोना व्हायरसला तोंड देणे अवघड होऊ शकते. रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्यास कारणीभूत असलेल्या घटकांबाबत जाणून घेवूयात…

हे लक्षात ठेवा

1 पालेभाज्या
पावसाळ्यात दुषित पाण्यातील भाज्यांचे सेवन केल्याने रोगराई पसरण्याचा धोका असतो. यासाठी पालेभाज्या गरम पाण्याने किंवा मीठाच्या पाण्याने चांगल्या धुवून स्वच्छ करा

2 मांसाहार
पावसाळ्यात समुद्रातील मासे खाणं टाळा. या दिवसात माशांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे माश्यांचे सेवन केल्याने वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते. फ्रेश आणि चांगले शिजलेले मास खा.

3 तेलकट पदार्थ
तेलकट पदार्थाचे सेवन टाळा. पावसाळ्यात अनेक घरांमध्ये तेलकट पदार्थ तयार केले जातात. यामुळे पचनक्रिया संथ गतीने होते.

4 बाहेरील पदार्थ
बाहेरील पदार्थ खाल्लयाने पोटाचे विकार उद्भवू शकतात. तसेच संसर्ग सुद्धा होऊ शकतो. म्हणून बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. फळांचे सेवन करा. पचनक्रियेसाठी घातक असलेल्या पदार्थांचे सेवन करू नका.