Monsoon diet tips : पावसाळ्यात चुकून देखील खाऊ नका ‘या’ 7 गोष्टी, ‘इम्यूनिटी’ सिस्टिम होईल ‘कमजोर’, ‘कोरोना’विरुद्धची ‘लढाई’ जाईल ‘अवघड’, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – मान्सूनमध्ये वाढत्या ओलाव्यामुळे अन्न खराब होण्याचा जास्त धोका असतो. याच कारणामुळे पावसाळ्यात खाद्यपदार्थांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. तज्ञांचे मत आहे की, पावसाळ्यात काही गोष्टी खाणे टाळल्या पाहिजेत. अन्यथा तुमची प्रतिकारशक्ती कमजोर होऊ शकते. सध्या कोरोना संकट देखील आहे आणि रोग प्रतिकारशक्ती कमजोर झाल्याने दुप्पट नुकसान होऊ शकते. पावसाळ्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते जाणून घेवूयात.

1 पालेभाज्या
पावसाळ्यात पालेभाज्या खाणे टाळावे. कारण हा हंगाम चिखल आणि ओलाव्याचा म्हणून ओळखला जातो. यामुळे संसर्गाचा जास्त धोका असतो. या हंगामात पालक, कोबी आणि फुलकोबीसारख्या भाज्या टाळाव्यात. कारले, शिराळी, तोंडली, घोसाळी, दोडका, अशा भाज्या खाव्यात. भाजी बनवण्यापूर्वी चांगली धुवा आणि चांगली शिजवा.

2 कापलेली फळे आणि त्यांचा रस
पावसाळ्याच्या हवेपासून ताजे पदार्थ दूर ठेवले पाहिजेत. या हंगामात फळांमध्ये कीड लागण्याचा जास्त धोका असतो, विशेषत: कापलेल्या फळांमध्ये. म्हणून, कोणत्याही परिस्थितीत आपण कापलेली फळे आणि रस पिणे टाळावे. यामुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

3 सीफूड
आपण नॉन-व्हेज खात असल्यास या हंगामात फक्त चिकन आणि मटण खावे. हा हंगाम मासे आणि कोळंबीच्या प्रजननाचा काळ आहे. यावेळी मासे सेवन केल्याने अनेक रोगांचा धोका असतो. खूप सवय असेल तर फक्त ताजे मासे खा. ते चांगले शिजवा.

4 तेलकट पदार्थ
पावसाळ्यात भजी, समोसा, वडापाव असे पदार्थ खाण्याची इच्छा होते, परंतु अशा गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. दमट हवेमुळे पचन प्रक्रिया कमजोर झालेली असते. यामुळे पोटाच्या समस्या होतात. गॅस्ट्रोनोमिकल समस्येमुळे पोट फुगणे, गॅस आदी समस्या होतात.

5 चाट
पाणीपुरी, भेळ पुरी, दही पुरी यामध्ये दूषित पाणाी वापरले जाऊ शकते. यामुळे संसर्गाचा धोका संभवतो. याच्या सेवनाने संक्रमणांमुळे अतिसार किंवा कावीळ यासारखे आजार उद्भवू शकतात.

6 फिज्जी पेय
अशा पेयांमुळे शरीरातील खनिजे कमी होतात, ज्यामुळे एंझाइम क्रिया कमी होऊ शकते. त्याचा सर्वात मोठा परिणाम पाचन तंत्रावर होतो आणि थकवा येतो. त्याऐवजी आल्याचा चहा, लिंबाचे पाणी इ. घ्या.

7 कच्चे पदार्थ
इतर हंगामात काही कच्चे पदार्थ खाणे लाभदायक ठरते, पण मान्सूनमध्ये हेच पदार्थ खाणे धोकादायक आहे. कारण या काळात किटाणू आणि संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. कच्च्या भाज्या खाण्याऐवजी त्या उकळून घ्या. फळांचे सेवन करण्यापूर्वी ती चांगली धुऊन घ्या.