Monsoon 2021 : 2 दिवसांत महाराष्ट्रात धडकणार ‘मान्सून’; जाणून घ्या सद्यस्थिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने संपूर्ण केरळ व्यापला आहे. काल सकाळपासून केरळमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकच्या दिशेने आगेकूच केली आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीचा बहुतांश भागात मान्सून दाखल (Monsoon filed) झाला आहे. कारवारपर्यंत मान्सून पोहोचला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Coronavirus In India Updates : लागोपाठ कमी होत आहेत केस, देशात कोरोनाची 1.31 लाख नवी प्रकरणे, 2,706 लोकांचा मृत्यू

दोन दिवस उशिराने मान्सून केरळमध्ये
आयएमडीने (IMD) केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे केरळमध्ये (Kerala) आगमन झाल्याचे गुरुवारी जाहीर केले. हवामान अनकूल असून पुढील दोन दिवसांत मान्सून कर्नाटकच्या काही भागांपर्यंत पोहचेल. अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. मान्सून केरळमध्ये 3 जून रोजी दाखल होईल असा सुधारित अंदाज व्यक्त केला होता. या अंदाजानुसार मान्सून दोन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला.

IMD चा सुधारित अंदाज
सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि केरळमधील उर्वरित भागासह दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हा भाग व्यापला आहे. बंगालच्या उपसागरातही मान्सून दाखल (Monsoon filed) झाला आहे. दक्षिणेतील वाऱ्याच्या चक्रीय गतीमुळे मागील आठवड्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग श्रीलंकेच्या परिसरात मंदावला होता. त्यानंतर आता वेग घेतला आहे.

या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून अरबी समुद्रातील काही भाग व्यापेल.
तसेच गोवा आणि महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
याशिवाय पुढील 2 ते 3 दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
यामध्ये रायगड, ठाणे, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

READ ALSO THIS :

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत

भाडेकरूंसाठी खुशखबर ! 2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये घरमालक

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलने मोडले सर्व विक्रम, सतत होतेय महाग, जाणून घ्या आजचे दर