#MonsoonFood : मासे आणि पालक टाळा, लिंबू आणि मेथीसह ‘हे’ 9 पदार्थ लाभदायक, जाणून घ्या

पावसाळ्यात खाण्यापिण्यात बेपर्वाई आरोग्यासाठी घातक ठरू शकते. या काळात पचनशक्ती कमजोर होते. या वातावरणात बाष्प असल्याने जीवाणु अधिक सक्रिय झाल्याने आजार वाढतात. पावसाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, ते जाणून घेवूयात…

1 पावसाळ्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका. यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि रक्तदाब वाढून खाज, जळजळ आणि एलर्जी होते.

2 लिंबाची पाने, कारले आणि मेथीदाणे या पदार्थांमध्ये संसर्गाशी लढण्याची ताकद असते.

3 अँटीऑक्सीडेंटयुक्त हळद खा.

4 आले, काळीमिरी, तुळस, मध, पुदीने टाकलेला चहा लाभदायक आहे.

5 बेसन, मध, लिंबू रस आणि लिंबूरसाने तयार फेस पॅक लावा.

6 या काळात हिरव्या पालेभाज्या पालक, कोबी आदी कमी खा. यावर किडे व बॅक्टेरिया असू शकतात.

7 पावसाळ्यात समुद्र जीवांचे प्रजनन सुरू असते. अंडेवाली मच्छी खाल्ल्याने ‘फूड पॉयजनिंगचा धोका वाढतो.

8 दही व अन्य डेयरी उत्पादनात सुद्धा बॅक्टेरिया जास्त असतात. याकाळात दही, ताक, लस्सी जास्त सेवन करू नका. दूध नेहमी उकळवून प्या.

9 या काळे कच्चे पदार्थ खाऊ नका. सलाड खायचे असल्यास ते थोडावेळ वाफवा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like