Monsoon illnesses | मान्सूनमध्ये मुलांना डेंगू, मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार; जाणून घ्या लक्षणे, उपचार आणि बचाव

नवी दिल्ली : Monsoon illnesses | मान्सून मध्ये मुलांना अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया आणि ताप, यासारख्या आजारांनी शरीरात वेदना, चट्टे, उलटी आणि पोटदुखीचा त्रास होतो. दूषित अन्न, पाणी आणि मच्छरांमुळे पसरणारा संसर्ग होऊ शकतो. मान्सूनमधील आजारांची (Monsoon illnesses) कोणती लक्षणे आहेत, त्यावरील उपचार आणि बचाव जाणून घेवूयात…

लक्षण

सामान्य सर्दी आणि फ्लूसह थकवा, ताप आणि शरीरात वेदना, ही लक्षणे आठवड्यापेक्षा कमी काळा राहतात. डॉक्टरांनुसार फ्लूने पीडित मुलाला सूप सारखे गरम द्रव पदार्थ द्यावेत. भरपूर आराम करावा.

अ‍ॅलर्जी आणि अस्थमाची स्थिती

इतर मुलांच्या जवळ जाऊ नये. वारंवार हात धुणे, खोकताना, शिंकताना नाक झाकून घेणे. वाढतील आर्द्रता आणि फंगसमुळे मुलांमध्ये अ‍ॅलर्जी आणि अस्थमाची स्थिती सुद्धा निर्माण होते.

Coronavirus | राज्यात ‘या’ दिवसापासून कोरोनाची तिसरी लाट?; गणेशोत्सवापूर्वी ‘निर्बंध’ पुन्हा कडक

उपचार

वेळेवर पीडियाट्रिशनसोबत संपर्क करा. यावर उपाय आराम आणि योग्य प्रमाणात द्रव पदार्थ आहे. मुलांना ओआरएस आणि द्रव पदार्थ, जसे की डाळीचे पाणी, ताक द्यावे.

प्रतिबंध

तज्ज्ञ सांगतात की, खाणे आणि स्वच्छतेच्या सवयींच्या बाबतीत सतर्कता ठेवावी. इम्यूनिटी वाढवण्यासाठी मुलांना फळे, दूध, अंडी आणि बदाम द्यावे. खाण्यापूर्वी फळे आणि भाज्या चांगल्याप्रकारे धुवून घ्या. पिण्याचे पाणी उकळवून किंवा आरओ/यूव्ही द्वारे फिल्टर करावे.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

स्ट्रीट फूड, मसालेदार आणि गोड पदार्थ टाळा. शौचालयाचा वापर केल्यानंतर मुलांना हात धुण्यास सांगा. पावसात भिजल्यास मुलांना गरम पाण्याने आंघोळ द्या. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका.

डॉक्टरांना भेटा

घरात आणि आजूबाजूला डेंगूच्या मच्छरांसाठी साठलेले पाणी नाही, याची खात्री करा. मुलांना उलटी, सुस्ती, पोटदुखी, लघवीला त्रास होत असेल तर डॉक्टरांना भेटा.

हे लक्षात ठेवा

– बाहेर पडताना मुलांना लांब हात आणि पायाचे कपडे द्या.

– मच्छरांपासून बचाव करण्यासाठी स्प्रे वापरा.

– पावसात योग्य शूज घाला, पाण्यात चालून आल्यानंतर पाय धुवा.

– अ‍ॅलर्जीपासून बचावसाठी नियमित चादर, गोधडी आणि इतर घरगुती वस्तू धुवून घ्या आणि बदला.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा तेजी, सोनं ’47’ हजार पार; जाणून घ्या

Ministry of Defence Recruitment 2021 | सरकारी नोकरीची संधी, 10 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज; 400 पदांसाठी भरती, जाणून घ्या

Relationship | धोकेबाज प्रियकरानं SORRY बोलून मागितला दुसरा ‘चान्स’, आता 1 वेळा ‘चॅट’ करण्याच्या बदल्यात 20 हजार घेते प्रेयसी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Monsoon illnesses | monsoon illnesses in children know the symptoms treatment and prevention

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update