खुशखबर ! केरळमध्ये मान्सून दाखल, आता पडणार ‘रिमझिम’ पाऊस

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   मान्सून आणि हवामानाविषयी माहिती देणाऱ्या खासगी एजन्सी स्कायमेटने सांगितले कि, दक्षिण पश्चिमी मान्सून आपल्या नियोजित वेळेपूर्वी म्हणजेच 30 मे रोजी केरळला पोहोचला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने या आठवड्यात सांगितले होते की, मान्सून 1 जूनला केरळ किनारपट्टीवर दाखल होईल. हवामान खात्याने गुरुवारी आपला अंदाज बदलला आयएमडीने सांगितले की, सध्याच्या परिस्थिती पावसाळ्याच्या आगमनासाठी अनुकूल बनली आहे. मात्र, यापूर्वी 5 जून रोजी मान्सून केरळला पोहोचणार असल्याचे सांगितले जात होते. स्कायमेटने दावा केला आहे की, मान्सून केरळमध्ये पोहोचला आहे. मागील वर्षी, आठ दिवसांच्या विलंबानंतर त्याने 8 जूनला केरळ किनारपट्टीवर धडक दिली होती. भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान दक्षिण- पश्चियी मान्सूनपासून पाऊस पडतो. हवामान खात्याने एप्रिलमध्ये सांगितले होते की, यावेळी मान्सून सरासरीच राहणार आहे. विभागाच्या मते, 96 ते 100% पाऊस हा सामान्य मान्सून मानला जातो.

कधी कोठे पोहोचणार मान्सून?

साधारणपणे 1 जून रोजी केरळ किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर 5 जून रोजी गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम आणि ईशान्येकडील राज्यात मान्सून दाखल होऊ शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 10 जून रोजी मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये प्रवेश करू शकेल. याशिवाय, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारमध्ये 15 ला मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेशातील उत्तरी भागात, पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मान्सून 20 जूनला दाखल होऊ शकेल. मात्र, 25 जूनपर्यंत उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, गुजरात आणि हिमाचलमध्ये मान्सून पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच जून अखेर उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडेल. मान्सूनचा अंतिम प्रवेश राजस्थान, पंजाब आणि हरियाणा येथे होईल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 30 जूनपर्यंत मान्सून या राज्यांमध्ये दाखल होऊ शकेल.

निम्म्याहून अधिक शेती सिंचनासाठी पावसावर अवलंबून –

भारतासारख्या कृषी देशासाठी मान्सून खूप महत्वाचा आहे. अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग शेतीवर आधारित आहे. देशातील निम्म्याहून अधिक शेती सिंचनासाठी पावसावर अवलंबून आहे. भात, मका, ऊस, कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी पाऊस खूप महत्वाचा आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे लॉकडाउन देशभरात लागू आहे. यामुळे, आशियाच्या तिसर्‍या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत समाविष्ट असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला या दिवसांत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दोन टप्प्यात जाहीर केला जातो अंदाज –

दरवर्षी हवामान विभाग दोन टप्प्यात दीर्घकालीन अंदाज जारी करतो. पहिला अंदाज एप्रिलमध्ये तर दुसरा अंदाज जूनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. यासाठी सांख्यिकीय एकत्रित पूर्वानुमान प्रणाली आणि महासागर वातावरणीय मॉडेल्सची मदत घेतली जाते. 1961 ते 2010 या वर्षात देशभरात दरवर्षी सरासरी 88 सेमी पावसाची नोंद झाली.