अखेर प्रतिक्षा संपली, मान्सून केरळमध्ये दाखल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी एक खुशखबर आली आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहायला लावणाऱ्या पावसाने अखेर आपल्या देशात प्रवेश केला आहे. आतुरतेनं वाट पाहत असलेला मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागानं याची घोषणा केली आहे. खरे तर १० जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र दोन दिवस आगोदरच त्याने प्रवेश करत सर्वांना खुश केले आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला असताना शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. मात्र दरवर्षीपेक्षा यावर्षी पावसाने अंतर देत जून महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी दर्शन दिले नव्हते. केरळमध्ये जरी मान्सूनचे आगमन झाले असले तरी महाराष्ट्र्रात येण्यासाठी आणखी ३ ते ४ दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी ती आनंदाची बातमी असेल.

दरम्यान, या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने चारा छावण्या सुरु केल्या असल्याने आणि अनुदान दिल्याने शेतकऱ्यांना या दुष्काळाच्या दाहकतेचा परिणाम कमी जाणवत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like