Mansoon in Mumbai : मुंबईत मॉन्सून दाखल ! कोकणासह मायानगरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mansoon in Mumbai : मुंबईसह कोकणाच्या उर्वरित भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले असून गेल्या १२ तासांहून अधिक वेळ मुंबई व कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून पावसाने मुंबईला झोडपले आहे़ यामुळे शहरातील जीवनवाहिनी म्हटली जाणारी लोकल सेवा ठप्प झाली आहे. सायन येथे रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून आता ते प्लॅटफॉर्मपर्यंत पोहचले आहे. मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस पडत आहे. पूर्व भागातील मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरात पावसाचा जोर कमी असल्याचे दिसत आहे.

आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कुलाबा येथे ७७ मिमी, सांताक्रुझ येथे ६०, रत्नागिरी येथे ११२, हर्णे येथे ६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई शहरात आज सकाळी ७ ते ८ या एका तासात ३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पूर्व उपनगरात २५ मिमी पाऊस पडला आहे. समुद्राला ११ वाजून ४५ मिनिटांनी उंच भरती येणार आहे.
यावेळी मुंबईत अतिमुसळधार पाऊस सुरुच राहिला तर शहरातील सखल भागात आणखी पाणी साचण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या भागात पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरु आहे.
येत्या ४ दिवसात कोकण, ठाणे, मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा

4 तप ‘सत्तेच्या पडछायेत’ असणारा प्रशासक काळाच्या पडद्याआड ! माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन

9 जून राशीफळ : ‘या’ 5 राशींना होणार धनलाभ, ग्रह-नक्षत्राची मिळेल पूर्ण साथ, इतरांसाठी असा आहे बुधवार

ट्विटर ला देखील फॉलो करा