Monsoon League Cricket Tournament 2023 | तिसरी ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; फ्रेन्डस् क्रिकेट क्लब, एकदंत क्रिकेट क्लब संघांची विजयी कामगिरी !!

पुणे : Monsoon League Cricket Tournament 2023 | एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत (Monsoon League Cricket Tournament 2023) फ्रेन्डस् क्रिकेट क्लब आणि एकदंत क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार प्रफुल्ल मानकर याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर फ्रेन्डस् क्रिकेट क्लब संघाने डिझायनर इलेव्हन संघाचा ७ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना फ्रेन्डस् क्रिकेट क्लबने १५३ धावा धावफलकावर लावल्या. शैलेश देशपांडे याने ५२ धावांची तर प्रफुल्ल मानकर याने नाबाद ३० धावांची खेळी केली. या आव्हानासमोर डिझायनर इलेव्हनचा डाव १८.४ षटकात १४६ धावांवर आटोपला. जगदीश सुर्वे (३५ धावा) आणि आदित्य बाकरे (२२ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. प्रफुल्ल मानकर याने ३४ धावात ४ गडी टिपले आणि संघाचा विजय सोपा केला. (Pune News)

अमोल नाजन याच्या अष्टपैलू खेळीमुळे एकदंत क्रिकेट क्लबने जोशी स्पोर्ट्स संघाचा २ गडी राखून पराभव केला. कर्णधार गणेश जोशी याच्या ५३ धावांच्या जोरावर जोशी स्पोर्ट्स संघाने १५७ धावांचे आव्हान उभे केले. शाम यादव याने ३० धावा तर, निलेश माळी याने ३३ धावांचे योगदान दिले. अमोल नाजन याने अचूक गोलंदाजी करत ६ धावात ३ गडी बाद केले. एकदंत क्रिकेट क्लबने १८.५ षटकात व ८ गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले. अमोल नाजन याच्या २२ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांसह केलेल्या ६४ धावांचा यामध्ये प्रमुख वाटा होता. (Monsoon League Cricket Tournament 2023)

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
फ्रेन्डस् क्रिकेट क्लबः १९ षटकात ७ गडी बाद १५३ धावा (शैलेश देशपांडे ५२ (२९, ४ चौकार, ४ षटकार),
प्रफुल्ल मानकर नाबाद ३०, अर्थव तांदळे २०, आदित्य बाकरे ४-४६) वि.वि. डिझायनर इलेव्हनः १८.४ षटकात १० गडी
बाद १४६ धावा (जगदीश सुर्वे ३५, आदित्य बाकरे २२, प्रफुल्ल मानकर ४-३४, सोहम सरवदे २-३५);
सामनावीरः प्रफुल्ल मानकर;

जोशी स्पोर्ट्सः १८.५ षटकात १० गडी बाद १५७ धावा (गणेश जोशी ५३ (२४, ७ चौकार, ३ षटकार), शाम यादव ३०,
निलेश माळी ३३, अमोल नाजन ३-६, भुषण गायके ३-३४) पराभूत वि. एकदंत क्रिकेट क्लबः १८.५ षटकात ८ गडी बाद
१५८ धावा (अमोल नाजन ६४ (२२, ५ चौकार, ७ षटकार), गणेश आंब्रे ३०, भुषण गायके २६, अर्णव अमृते ४-२५,
गणेश जोशी २-१३); सामनावीरः अमोल नाजन;

Advt.

Web Title :  Monsoon League Cricket Tournament 2023 | 3rd ‘Monsoon League’ Championship T20 Cricket Tournament; Friends Cricket Club, Ekdan Cricket Club Teams Winning Performance !!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, टीका करताना शरद पवारांचा एकेरी उल्लेख (व्हिडिओ)

Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून कात्रज चौकात रात्रीच्या वेळी परराज्यातील प्रवाशांना लुटणार्‍यांना अटक

Chandrakant Patil – Kothrud Pune | लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार – चंद्रकांत पाटील