Monsoon League Cricket Tournament 2023 | तिसरी ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; ग्लोबल वॉरीयर्स, आयोध्या वॉरीयर्स संघांचे विजय!!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Monsoon League Cricket Tournament 2023 | एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत (Monsoon League Cricket Tournament 2023) ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब आणि आयोध्या वॉरीयर्स क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत विनायक शिंत्रे याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आयोध्या वॉरीयर्स क्रिकेट क्लबने डिझायनर इलेव्हन संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना डिझायनर इलेव्हन संघाने १६५ धावांचे आव्हान उभे केले. वरद हांडे (५५ धावा) आणि जयदीश सुर्वे (४४ धावा) यांच्या फलंदाजीच्या योगदानामुळे संघाचा डाव उभा केला गेला. के आव्हान आयोध्या वॉरीयर्स क्रिकेट क्लबने सहज पूर्ण केले. विनायक शिंत्रे याने २४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. या सोबतच शंतनु गांधी याने नाबाद ५६ धावांची तर, आदित्य कुलकर्णी याने नाबाद ४२ धावांची खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

शशांक जोशी याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने एलके इलेव्हन संघाचा ३१ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने १८० धावा धावफलकावर लावल्या. शशांक जोशी (५१ धावा), मनिष शेजवाल (३५ धावा) आणि प्रसन्ना मोरे (३० धावा) यांनी संघाला समाधानकारक धावसंस्या गाठून दिली. या आव्हानासमोर एलके इलेव्हन संघाचा डाव १४९ धावांवर मयादित राहीला. समीउद्दीन शेख (३-१७) आणि क्षितीज आपटे (२-२१) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाचा विजय सोपा केला. (Monsoon League Cricket Tournament 2023)

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
डिझायनर इलेव्हनः २० षटकात ८ गडी बाद १६५ धावा (वरद हांडे ५५ (३९, ६ चौकार, २ षटकार), जयदीश सुर्वे ४४,
गणेश मिसाळ २-२९, सिध्दार्थ वैद्य २-२३) पराभूत वि. आयोध्या वॉरीयर्स क्रिकेट क्लबः १७.५ षटकात १ गडी बाद
१६६ धावा (विनायक शिंत्रे ५१ (२४, ८ चौकार, २ षटकार), आदित्य कुलकर्णी नाबाद ४२, शंतनु गांधी नाबाद ५६
(३५, ५ चौकार, २ षटकार); सामनावीरः विनायक शिंत्रे;

ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबः २० षटकात ७ गडी बाद १८० धावा (शशांक जोशी ५१ (३७, ७ चौकार, २ षटकार),
मनिष शेजवाल ३५, प्रसन्ना मोरे ३०, हृषिकेश आगाशे २-३९) वि.वि. एलके इलेव्हनः १९.३ षटकात १० गडी बाद
१४९ धावा (शंतनु आठवले ३०, प्रतिक गोळे ३५, समीउद्दीन शेख ३-१७, क्षितीज आपटे २-२१); सामनावीरः शशांक जोशी.

Web Title :  Monsoon League Cricket Tournament 2023 | 3rd ‘Monsoon League’ Championship T20 Cricket Tournament; Victory of Global Warriors, Ayodhya Warriors!!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Violence | कोल्हापूर हिंसाचार प्रकरणी छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘आता जे झालं ते झालं, यापुढे…’

Sara Ali Khan | अखेर क्रिकेटर सोबत लग्न करणार का नाही यावर साराने दिलं उत्तर…!

NCP Chief Sharad Pawar | ‘कोल्हापूरमध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही’, हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर शरद पवारांचं आवाहन