Monsoon League Cricket Tournament 2023 | तिसरी ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा

 ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबचा विजयी षटकार; डिझायनर इलेव्हन, फोनिक्स् इलेव्हन संघांचा दुसरा विजय !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Monsoon League Cricket Tournament 2023 | एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत (Monsoon League Cricket Tournament 2023) ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत सलग सहावा विजय नोंदविला. डिझायनर इलेव्हन व फोनिक्स् इलेव्हन संघांनी स्पर्धेत दुसर्‍या विजयाची नोंद केली.

 

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सामन्यात मनिष शेजवाल याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने गेम स्विंगर्सचा ९ गडी राखून सहज पराभव केला. गेम स्विंगर्सने १३७ धावा धावफलकावर लावल्या. हे आव्हान ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने १ गडी गमावून पूर्ण केले. मनिष शेजवाल (नाबाद ५२ धावा), कृष्णा चौधरी (३२ धावा) आणि तनिष ठाकरे (नाबाद २४ धावा) यांनी संघाला सहज मिळवून दिला.

 

गणेश मिसाळ याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर फोनिक्स् इलेव्हनने एकदंत क्रिकेट क्लबचा ६ गडी राखून पराभव केला. गणेश मिसाळ याने ९ धावात ५ गडी बाद करून फोनिक्स् संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एकदंत क्रिकेट क्लबचा डाव ९६ धावा आटोपला. फोनिक्स् इलेव्हनच्या गणेश मिसाळ (नाबाद ४८ धावा) आणि महेश घोरपडे (३३ धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाने विजय नोंदविला. (Monsoon League Cricket Tournament 2023)

 

जगदीश सुर्वे याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर डिझायनर इलेव्हन संघाने डेड्ली डायनामोज् क्रिकेट क्लबचा ५ गडी राखून पराभव करून दुसरा विजय मिळवला. जयदीश याने ५६ धावांची खेळी केली, यासह १७ धावात २ गडी बाद करून अष्टपैलू कामगिरी केली.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

एकदंत क्रिकेट क्लबः १८ षटकात १० गडी बाद ९६ धावा (सुदर्शन गुणे ३२, अमोल नाजन १५, गणेश मिसाळ ५-९) पराभूत वि. फोनिक्स् इलेव्हनः १८ षटकात ४ गडी बाद १०२ धावा (गणेश मिसाळ नाबाद ४८, महेश घोरपडे ३३, सुदर्शन गुणे २-१७); सामनावीरः गणेश मिसाळ;

डेड्ली डायनामोज् क्रिकेट क्लबः २० षटकात ९ गडी बाद १२८ धावा (अनिकेत कुलकर्णी ४२,
अभिनय रॉय नाबाद ३२, वरद हांडे ३-२३, महेश हांडे २-११, जयदीश सुर्वे २-१७)
पराभूत वि. डिझायनर इलेव्हनः १३.२ षटकात ५ गडी बाद १३० धावा
(जयदीश सुर्वे ५६ (३६, ५ चौकार, ४ षटकार), धवल त्रिवेदी १७, मेहूल राठोड १६, सुमित अगरवाल ३-२७); सामनावीरः जगदीश सुर्वे;

गेम स्विंगर्सः १९.५ षटकात १० गडी बाद १३७ धावा (रणजीत कुलकर्णी ३०,
विलास खाडे नाबाद २५, शैलेश साठे २१, मनिष शेजवाल ३-२४, हर्षद तिडके २-२१)
पराभूत वि. ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबः १७.५ षटकात १ गडी बाद १३९ धावा
(मनिष शेजवाल नाबाद ५२ (५१, ४ चौकार), कृष्णा चौधरी ३२, तनिष ठाकरे नाबाद २४);
(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी कृष्णा आणि मनिष यांच्यात ७७ (६७); सामनावीरः मनिष शेजवाल;

 

 

Web Title : Monsoon League Cricket Tournament 2023 | Global Warriors Cricket Club’s winning six; Second win for
Designer XI, Phoenix XI

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा