Monsoon League Cricket Tournament 2023 | तिसरी ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; एचआरकॅपिटा सोल्युशन इलेव्हनचा सलग पाचवा विजय; ट्रोजन्स् क्रिकेट क्लबची विजयी कामगिरी !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Monsoon League Cricket Tournament 2023 | एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत (Monsoon League Cricket Tournament 2023) एचआरकॅपिटा सोल्युशन इलेव्हन संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत स्पर्धेत सलग पाचवा विजय संपादन केला. ट्रोजन्स् क्रिकेट क्लबने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून तिसर्‍या विजयाची नोंद केली.

 

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सामन्यात रोहीत साळुंखे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एचआरकॅपिटा सोल्युशन इलेव्हनने फोनिक्स् इलेव्हनचा ६ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना फोनिक्स् इलेव्हनने १०८ धावा धावफलकावर लावल्या. रोहीत साळुंखे याने १० धावात ४ गडी बाद केले. सौरभ भोसले (२-१६) आणि मिहीर रीसबुड (२-२७) यांनीही अचूक गोलंदाजी केली. हे आव्हान एचआरकॅपिटा सोल्युशन इलेव्हनने १८.१ षटकात पूर्ण केले. प्रफुल्ल मानकर नाबाद ३२ धावा, अभिमन्यु ढमढेरे २५ धावा, अनिरूध्द प्रभूणे १८ धावा आणि रोहीत ननावरे १६ धावांच्या जोरावर संघाने सलग पाचवा विजय मिळवला.

 

गौरव उपाध्याय याच्या अष्टपैलू खेळीमुळे ट्रोजन्स् क्रिकेट क्लबने युनायटेड इलेव्हनचा ५ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ट्रोजन्स् संघाच्या गोलंदाजांच्या गोलंदाजीसमोर युनायटेड इलेव्हनचा डाव ८८ धावांवर गडगडला. गौरव उपाध्याय याने ८ धावात ३ गडी बाद केले. आकाश पुरोहीत याने ९ धावात २ गडी बाद करून दुसर्‍या बाजुने अचूक गोलंदाजी केली. गौरव उपाध्याय (४० धावा), यश तौशालकर (१४ धावा) आणि मोहम्मद अझरूद्दीन (१३ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ट्रोजन्स् क्रिकेट क्लबने हे लक्ष्य १४.१ षटकात पूर्ण केले. (Monsoon League Cricket Tournament 2023)

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

युनायटेड इलेव्हनः १७ षटकात १० गडी बाद ८८ धावा (ओंकार गोखले २२, आयुष देव १७, गौरव उपाध्याय ३-८, आकाश पुरोहीत २-९) पराभूत वि. ट्रोजन्स् क्रिकेट क्लबः १४.१ षटकात ५ गडी बाद ९० धावा (गौरव उपाध्याय ४०, यश तौशालकर १४, मोहम्मद अझरूद्दीन १३, धीरज शेट्टी १-९); सामनावीरः गौरव उपाध्याय;

फोनिक्स् इलेव्हनः १७.१ षटकात १० गडी बाद १०८ धावा (अनिल मांडके ४०,
मधुर जेठीला १३, सचिन सामल १४, रोहीत साळुंखे ४-१०, सौरभ भोसले २-१६, मिहीर रीसबुड २-२७)
पराभूत वि. एचआरकॅपिटा सोल्युशन इलेव्हनः १८.१ षटकात ४ गडी बाद ११२ धावा
(प्रफुल्ल मानकर नाबाद ३२, अभिमन्यु ढमढेरे २५, अनिरूध्द प्रभूणे १८, रोहीत ननावरे १६, सोहम सरवदे २-२१); सामनावीरः रोहीत साळुंखे.

 

Web Title : Monsoon League Cricket Tournament 2023 | HRCapita Solutions XI’s fifth win in a row;
A winning performance by Trojans Cricket Club

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा