खुशखबर ‘या’ दिवशी मान्सून केरळात : स्कायमेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दुष्काळाने होरपळत असलेल्या महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून ४ जून रोजी केरळमध्ये दाखल होईल. मात्र त्यापुढे मुंबईसह राज्यभरात मान्सून उशीराने दाखल होईल, असा अंदाज खाजगी हवामान संस्था स्कायमेटने वर्तवला आहे. राज्यात सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला होता. केरळमध्ये जरी चार जून रोजी मान्सून तरी महाराष्ट्रात मात्र तो उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भात मात्र कमी पाऊस पडणार असल्याचे देखील स्कायमेटने सांगितले आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भवासियांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय मुंबईत देखील मान्सून उशिरा दाखल होणार आहे. ८ ते १० जूनच्या दरम्यान मान्सून मुंबईत दाखल होतो. मात्र यावर्षी साधारण २० जूनपर्यंत तो दाखल होण्याचा अंदाज आहे. तसेच देशभरात देखील मान्सून कमी प्रमाणात असेल.

दरम्यान, भारतातील जवळपास ७० टक्के शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे स्कायमेटच्या नव्या अंदाजाने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात पडलेला दुष्काळ आणि कमी पावसाचा अंदाज यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडणार आहे.