यंदा पावसाची महाराष्ट्रावर वक्रदृष्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दुष्काळाने होरपणाऱ्या महाराष्ट्राला यंदाही दुष्काळाच्या झळा बसण्याची चिन्हे आहेत. कारण यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे. साउथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरमने (SASCOF) याबाबत अंदाज वर्तवला आहे.

यंदा देशात मान्सून संपूर्ण मोसमात तो समाधानकारक असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या अंदाजामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र महाराष्ट्राला यापासून वंचितच रहावे लागणार आहे. कारण देशभर पाऊस समाधानकारक पडणार असला तरी महाराष्ट्राच्या वाटेला थोडाच येणार आहे. साउथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरमने नेपाळमधील काठमांडू येथे १८ ते २३ एप्रिल दरम्यान बैठकीनंतर एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून यंदाच्या मान्सूनचा अंदाज वर्तविला आहे.

SASCOF च्या अंदाजानुसार, जून आणि सप्टेंबर दरम्यान भारतासह दक्षिण आशियात मान्सून सामान्यच राहणार आहे. मात्र महाराष्ट्रातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषकरून कोकणात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे.