पुण्यात ‘हाय अलर्ट’, पुढील ‘५’ दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे, पुण्यात देखील मागील ४ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे आणि येणाऱ्या ५ दिवसात मान्सून अधिक सक्रिय होणार आहे. हवामान विभागाने पुढील दिवसांसाठी पुण्यात होणाऱ्या दमदार पावसाचा अंदाज बांधत पुण्यात ५ दिवसाचा हाय अलर्ट लागू केला आहे.

हवामान विभागाच्या मते कमी दबामुळे मान्सून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रमार्ग मध्यप्रदेशात सरकत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुण्यात जोरदार मान्सून बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संपूर्ण देशाबरोबरच महाराष्ट्रात जास्त करुन उत्तरी भागात जवळपास ५१ ते ७४ टक्के क्षेत्रात व्यापक स्वरुपात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अनेक क्षेत्रात ३ जुलैपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुण्यात ५ दिवस हाय अलर्ट –
४ आणि ५ जुलैला कोकण आणि गोव्यात देखील जोरदार पाऊस होणार आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या दरम्यान कोकण गोवा विदर्भात १ आणि २ जुलैला विविध भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर ३ ते ५ जुलै दरम्यान महाराष्ट्रातील उत्तर भागात जोरदार पाऊसामुळे चेतावनी देण्यात आली आहे.

पुण्यात यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो, यामुळे येणाऱ्या ५ दिवसात पुण्यात पावसाचा हाय अलर्ट लागू करण्यात आल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. या कारणाने लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लठ्ठपणाचा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम, काळजी घेणे गरजेचे

‘या’ घरगुती उपयांनी करा चेहरा मॉइश्चरायईज

‘नाईट शिफ्ट’मध्ये काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ अवश्य खा

जाणून घ्या आरोग्यवर्धक ‘जवसाचे’ फायदे

नोकरी शिक्षणानंतर आता स्थानिक निवडणुकांत मराठा आरक्षण ?