‘या’ 8 राज्यात पुढच्या 24 तासात ‘कोसळधार’ पाऊस, कोची विमानतळ बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवामान खात्याने पुढील २४ तासामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि राज्यस्थान मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने या राज्यांना रेड अलर्ट दिला आहे.

केरळ मध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोची विमानतळ रविवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार १ जून पासून आत्तापर्यंत भारतामध्ये ५ टक्के पाऊस कमी पडला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट रोजी गुजरात, कोस्टल कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दक्षिण राजस्थान, दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश, कोकण तसेच गोवा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडू, पाँडेचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त