घरच्या घरीच बनवा खमंग, चटकदार पोह्यांची कचोरी !

तुम्ही कचोरी तर अनेकदा खाल्ली असेल. पंरतु पोह्यांची कचोरी कधी खाल्ली आहे का ? नक्कीच नसेल खाल्ली. आज आपण पोह्याच्या कचोरीची खास रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहित्य –

– पातळ पोहे 2 वाट्या.
– मीठ चवीनुसार
– तेल 2 चमचे
– आलं-लसूण पेस्ट 1 चमचा
– बडीशेप अर्धा चमचा
– धने-जिरे पावडर 1 चमचा
– हळद
– तिखट चवीनुसार
– आमचूर पावडर अर्धा चमचा
– बेसन अर्धी वाटी
– मीठ आणि साखर चवीनुसार
– कोथिंबीर 4 चमचे
– तेल अर्धी वाटी

कृती –

– 2 वाट्या पातळ पोहे भिजवून त्याचं पाणी काढून टाका. आता ते चांगले मळून त्यात चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल घालून बाजूला ठेवा.

– दुसऱ्या पॅनमध्ये 2 चमचे तेलात 1 चमचा आलं लसून पेस्ट परतून घ्या. त्यात अर्धा चमचा बडीशेप, धने-जिरे पावडर, हळद, तिखट, आमचूर पावडर घालून मसाला परतून घ्या.

– नंतर यात अर्धी वाटी बेसन चवीनुसार मीठ, साखर घालून मिश्रण एकत्र करा.

– नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाण्याचा हबका मारून झाकण लावून शिजू द्या. भिजवलेल्या पोह्याचा एक गोळा तोडून त्याची लाटी तयार करा.

– मधोमध मसाला भरून चारही बाजूनं बंद करून दोन्ही हातांनी दाबून चपटे करा.

– तळण्यापूर्वी तेल मध्यम गरम करून त्यात तयार वाट्यांना मधोमध दाबून वाटीसारखा आकार द्या.

– मंद आचेवर तळून घ्या.

– आता तुमची गरमाम गरम पोह्यांची कचोरी खाण्यासाठी तयार आहे.