चार आठवडयांचा हवामानाचा अंदाज जाहीर ! 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा ‘मुक्काम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई मध्ये अधून मधून सरी कोसळत असल्या तरी राज्यात जोरदार कोसळत आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी पाऊस जोरदार कोसळत आहे. हवामान खात्याने पुढील ४ आठवडे पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार १५ ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता संपूर्ण कोकणात २०आणि २१ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जरी करण्यात येणार आहे. भारतीय हवामान खात्याने १७ सप्टेंबर रोजी ४ आठवड्यांचा अंदाज जाहीर केला आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मध्य भारत आणि दक्षिण भागात पावसाचा जोर असणार आहे. त्यानंतर तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. तरी याबाबतची माहिती पुन्हा जाहीर करण्यात येणार आहे.

गेल्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर १८ व १९ सप्टेंबर रोजी कोकण ,गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. १८ आणि १९ सप्टेंबर रोजी मुंबई आणि मुंबई उपनगरात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पहिला आठवडा : १८ ते २४ सप्टेंबर – उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मध्य भारतासह दक्षिण भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. उत्तर पूर्व भारतातदेखील चांगला पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

दुसरा आठवडा : २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर – पश्चिम भारतासह दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता . उत्तर पश्चिम भागात पण चांगला पाऊस होण्याची शक्यता

तिसरा आठवडा : २ ते ८ ऑक्टोबर- उत्तर पश्चिम भारतात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चौथा आठवडा : ९ ते १५ ऑक्टोबर – उत्तर पश्चिम भारतात पावसाचा जोर कमी होईल.