Monsoon Update | पुढील दोन दिवसांत पावसाची ‘या’ भागात लागणार वर्णी; हवामान खात्याचा अंदाज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वांना आता मान्सूनचे वेध लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात ढगाळ वातावरण तयार होत असले तरी, पुणेकरांना पाऊस हुलकावणी देऊन जात आहे. मात्र आता येत्या 2 दिवसांमध्ये पावसाची प्रतिक्षा संपणार असल्याचा अंदाज (Monsoon Update) वर्तवण्यात येत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मालदीव बेट (Maldives Island) व बंगालचा उपसागर (Bay of Bengal) व दक्षिण अरबी समुद्र (South Arabian Sea) यातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे अशी माहिती पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी दिली आहे. (Monsoon Update)

 

पुणे जिल्ह्यात काही परिसरात जोरदार वाळव्याचा पाऊस झाला तर, हिंगोली (Hingoli) व गोंदिया (Gondia) भागात सोसाट्याच्या वाऱ्याने थैमान घातले. यामुळे पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र पुणे शहरात अजून पावसाची सुरुवात झालेली नाही. मान्सून 19 मे रोजी अंदमान निकोबार बेटावर (Andaman And Nicobar Islands) दाखल होता मात्र नंतर त्याचा वेग मंदावला. काही दिवस मान्सून अंदमानात स्थिरावला होता. आता तो हळूहळू नैऋत्य दिशेला सरकू लागला आहे. मान्सून आता बंगालच्या उपसागराकडे जाऊ लागला असल्याचे सांगितले जात आहे. या संबंधीचे टविट् कृष्णानंद होसाळीकर यांनी केले आहे.

 

या आधी खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने (Skymet) या संस्थेने देशात उशीरा मान्सुन दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. देशात दरवर्षी पावसाचे आगमन केरळच्या किनारी (Kerala Coast) मार्गावरुन साधारणपणे 1 जूनला होते. मात्र आता त्याला उशीर झाला असून केरळमध्ये 4 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. (Monsoon Update)

Advt.

दरम्यान, आग्नेय अरबी समुद्रावर एक वातावरणीय कुंड तयार झाले आहे.
यामुळे केरळमधील काही भागांत मुसळधार पाऊस (Rain Arrival) कोसळण्याची शक्यता आहे.
केरळमधील इडुक्की (Idukki) जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

 

Web Title :  Monsoon Update | In the next two days, rain is expected in ‘this’ area; Weather forecast

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा