monsoonUpdate | राज्यात मान्सूनचे दमदार आगमन; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अलर्ट जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – monsoon Update | गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा दमदार आगमन केलं आहे. राज्यातील अनेक भागात पासने सुरुवात केली आहे. दरम्यान हवामान विभागाने (IMD) उद्या कोकणात तर १२ जूनला पश्चिम महाराष्ट्रात (western maharashtra) ऑरेंज अलर्ट ( orange alert) जारी केला आहे. monsoon update|  monsoon covers maharashtra orange alert for konkan and western maharashtra

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील थळीउक्कलगाव,शेळगावं परिसरात दमदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे फालगुनी नदीला अचानक पूर आल्याने परिसरातील नागरिकांना गुडग्या एवढ्या पाण्यातून वाट काढावी लागली. तर नागपूरमध्येही पावसाने हजेरी लावली. शहरातील सखल भागात पाणी साचलं होत. गीता मंदिर शेजारच्या रस्तावर तर पाणीच पाणी साचल्याचं चित्र आहे. गडचिरोलीतही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील सखल भागात पाणी साठले आहे. नगर पालिका इमारतीला अक्षरशः तलावाचं स्वरूप आल आहे. सर्वाधिक पाऊस देसाईगंज तालुक्यात झाला आहे. दरम्यान, नाल्यांवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे गडचिरोली-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील शेतीची खोळंबलेली कामं राज्यात मान्सूनच्या (monsoon)  पुनरागमनामुळे पुन्हा सुरु झालीत. भात लावणीच्या कामालाही वेग आलाय. लावणीच्या वेळी गायल्या जाणाऱ्या आंबोण्यांचे सूर ऐकू येऊ लागल्याने शेतशिवारांना जाग आलीय. नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाने धुवांधार बॅटींग केली असून अनेक भागातले रस्ते जलमय झाले.

Web Title : monsoon update monsoon covers maharashtra orange alert for konkan and western maharashtra

 

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम

Pimpri Crime News | ‘बजाज’ मधून निम्म्या किंमतीत गाड्यांचे आमिष पडले साडेसात लाखांना; बजाज कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून दोघा भावांनी घातला व्यावसायिकाला गंडा

Koregaon Bhima Inquiry Commission | कोरेगाव भीमा हिंसाचार आयोग साक्षीसाठी शरद पवार यांना बोलवणार; कोरोनामुळे ठप्प झाले होते कामकाज

Health News | जर तुम्हाला लांब आणि मऊ केस हवे असेल तर आजपासून ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, जाणून घ्या

Pune Crime News | ‘बेटर हाफ’ वेबसाईटवरून ओखळ झाल्यानंतर लग्नाच्या अमिषाने 28 वर्षीय तरूणीची 9 लाखांची फसवणूक