Monsoon Weather Update | मान्सूनच्या वाटचालीला 48 तासांचा ब्रेक ! लवकरच भारतात दाखल होणार – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Monsoon Weather Update | एकीकडे उन्हाचा कडाका लागल्याने हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department-IMD) अंदाजानुसार पावसाची (Rain) परिस्थिती निर्माण झाली आहे. या दरम्यान, मान्सून लवकरच भारतात (Monsoon Weather Update) येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान दोन दिवस लांबवणीवर गेल्याने पावसाची प्रतिक्षा करावी लागेल. सध्या मान्सून सक्रीय झाला असताना त्याच्या वाटचालीला 48 तासांचा ब्रेक लागला आहे. मान्सून सध्या श्रीलंकेच्या (Sri Lanka) वेशीवरच अडकला असल्याची माहिती मिळत आहे.

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार (IMD), 48 तासात मान्सून पुढे सरकण्यास पोषक हवामान आहे. मात्र, त्यानंतर मान्सून प्रगतीबाबत हवामान विभागाच्या संकेतस्थळावर काल म्हणजे 25 तारखेला संध्याकाळी अपडेट करण्यात आले आहे. त्यानुसार मान्सून 2 दिवसानंतर पुन्हा सक्रीय होणार असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान आताच्या माहितीनुसार अपडेट केलेल्या नकाशात मान्सून 23 तारखेला जिथे होता, तिथेच असल्याचं दिसत आहे. (Monsoon Weather Update)

”केरळमध्ये (Kerala) 27 मे रोजी मान्सून पुन्हा सक्रीय होईल आणि हंगामी पाऊस सामान्य होण्याची शक्यता आहे. पाऊस सामान्य 99 टक्के अपेक्षित आहे. केरळमध्ये 27 मे रोजी मान्सूनची सुरुवात अपेक्षित आहे. आगामी पाच दिवसामध्ये कोकण (Konkan) आणि गोवा प्रदेश (Goa) आणि राज्याच्या इतर भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. त्याचबरोबर हलका पाऊस पडणार आहे,” असे आयएमडी मुंबईचे प्रमुख जयंता सरकार (Jayanta Sarkar) यांनी सांगितले आहे.

 

दरम्यान, नैऋत्य मॉन्सून आगामी 48 तासांमध्ये नैऋत्य अरबी समुद्राच्या (Arabian Sea) काही भागामध्ये,
आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन परिसर, दक्षिण आणि पूर्व मध्य बंगालचा उपसागर
आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागामध्ये पुढे सरकण्याची शक्यता असल्याची माहिती
भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) दिली आहे.

 

Web Title :- Monsoon Weather Update | monsoon expected in kerala on may 27 seasonal rainfall expected to be normal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा