खुशखबर ! येत्या ४८ तासांत मान्सून राज्यात ‘धडकणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दुष्काळाने होरपळणाऱ्या आणि पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी आहे. रेंगाळलेला मान्सून येत्या २४ तासांत तळकोकणात दाखल होण्याची चिन्हं आहेत. त्यानंतर पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती मुंबई हवामान विभागानं दिली आहे. अरबी समुद्रात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होणार असून नंतर तो उत्तर कोकणामध्ये दाखल होईल व उद्या संध्याकाळपर्यंत मान्सून मुंबईत पोहचेल व त्यानंतर संपूर्ण राज्यात दाखल होईल. सध्या मान्सून उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या परिसरात आहे.

साधारणपणे दर वर्षी एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो व पुढील सहा ते सात दिवसांत कर्नाटकसह महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होते. मात्र यंदा प्रतिकूल परिस्थितीमुळे मान्सूनचा प्रवास सुरुवातीपासूनच उशिरा सुरू झाला. मात्र या वेळी मान्सूनच्या प्रवासात अनेक अडथळे येत आहेत. वायू वादळामुळे मान्सून लांबला आहे. वादळाची तीव्रता रविवारी ओसरल्याने मान्सूनसाठी पुन्हा पोषक वातावरण निर्माण झाले आहे. २१ तारखेपर्यंत मान्सून कोकणात येईल आणि २४ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल.

आरोग्यविषयक वृत्त –

डोकेदुखीची वेदना एक…परंतु, कारणे असू शकतात वेगवेगळी

दुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्यास दूर पळतील अनेक आजार

प्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती

तेजस्वी डोळ्यांसाठी गुणकारी औषधी वनस्पतींचा वापर