Masik Rashifal-April : ‘या’ 7 राशींच्या अडचणी वाढवणार एप्रिल, जाणून घ्या कशी असेल तुमच्या राशीची स्थिती

पोलीसनामा ऑनलाईन टीम : एप्रिल महिन्याची सुरुवात वृश्चिक लग्नात होत आहे आणि या दिवशी चंद्र तुळ राशीत आहे. सूर्य-शुक्राची गुरु-शनीची आणि राहु-मंगळची युती आहे. महिन्याच्या सुरूवातीलाच बृहस्पतीचे राशी परिवर्तन होईल. ग्रहांच्या अशा स्थितीने संपूर्ण महिन्याचे राशीचक्र स्पष्ट होते. ज्योतिषांनी मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या जातकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. एप्रिल महिन्यात कोणत्या राशींना लाभ होणार आणि कुणाला थोडे सावध राहण्याची आवश्यकता आहे ते जाणून घेवूयात…

मेष 
एप्रिल महिना कार्यक्षेत्रात चढ-उताराचा आहे, कारण राहु आणि मंगळची उपस्थिती दशम स्थानाला वाईट प्रकारे प्रभावित करत आहे. यामुळे नोकरीत एखादी समस्या निर्माण होऊ शकते. कार्यक्षेत्रात एखाद्याशी वाद वाढू शकतो. यापासून वाचण्याचा प्रयत्न करा. प्रेम आणि विवाहाच्या प्रकरणात वेळ अनुकुल आहे.

वृषभ 
एप्रिल महिना तुमच्यासाठी काही बाबतीत अतिशय खास आहे. हा महिना आर्थिकबाबतीत प्रगतीचा राहिल. एकापेक्षा जास्त ठिकाणाहून पैशाची प्राप्ती होण्याचे योग आहेत. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्यात सुधारणा होत जाईल. करियरमध्ये परिवर्तन करण्याचा विचार मनात येऊ शकतो. धन आणि धर्माच्या कामात व्यस्त रहाल.

मिथुन
खर्चात अप्रत्यक्ष वाढ होईल, ज्यामुळे आर्थिक आव्हाने वाढतील. तर दुसरीकडे आरोग्य सुद्धा प्रभावित होऊ शकते. आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळावा लागेल अन्यथा आजारी पडण्याचा, दुखापत होण्याचा योग आहे. नाती आणि कौटुंबिक स्थितीत सुधारणा होईल.

कर्क 
हा महिना तुमच्यासाठी चढ-उताराचा आहे. उत्पन्न येत-जात राहील. सप्तम स्थानात होत असलेल्या शनी आणि गुरुच्या युतीचा योग बिझनेससाठी खुप चांगला आहे. कामात जास्त मदत होईल आणि चांगली प्रगती करू शकता. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. महत्वाच्या कामांना विलंब होऊ शकतो.

सिंह 
एप्रिल महना तुमच्यासाठी थोडा अडचणींचा आहे, कारण राहु आणि मंगळची उपस्थिती दशम स्थानाला वाईट प्रकारे प्रभावित करत आहे. यामुळे नोकरीत काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. कार्यक्षेत्रात वाद वाढू शकतो. तो टाळण्याचा प्रयत्न करा. आरोग्य आणि मनाच्या समस्यांमध्ये सुधारणा होईल. वाहन चालवणे आणि वादात सावधगिरी बाळगा.

कन्या 
एप्रिलमध्ये तुमच्या समोर काही समस्या येऊ शकतात. भाग्याची साथ मिळू शकणार नाही. महिन्याचा पूर्वार्ध थोडा कमजोर आहे. यासाठी जे सुद्धा मोठे आणि महत्वाचे निर्णय आहेत ते महिन्याच्या उत्तरार्धात घ्या. ज्यामुळे कोणतीही समस्या येणार नाही. स्थान परिवर्तनाचा योग आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाबाबत चिंता होऊ शकते.

तुळ 
एप्रिल महिन्या काही अडचणी वाढवणारा आहे. व्यावहारिक होणे चांगले ठरू शकते. कौटुंबिक जीवनात अनेक आव्हाने येतील. आरोग्य समस्यांप्रती सतर्क राहणे आवश्यक आहे. काही नवीन आणि चांगले काम सुरू होऊ शकते. यावेळी वाणी आणि स्वभावाकडे लक्ष द्या.

वृश्चिक 
हा महिना व्यापारावर वाईट परिणाम करू शकतो. प्रेमसंबंधात लकी राहाल. प्रेमविवाहाची चर्चा पुढे सरकू शकते. वैवाहिक लोकांना जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. भाऊ-बहिण जीवनात पुढे जाण्यासाठी सहकार्य करतील. करियरमध्ये नवीन सुरुवात आणि परिवर्तन होईल. दुर्घटना आणि आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहा.

धनु 
एप्रिल महिन्यात थोडी विचारपूर्वक वाटचाल करा. नोकरीत खुप सावध राहू काम करावे लागेल. आपलीच काही माणसं ज्यांच्यावर विश्वास आहे, ती तुमच्या विरूद्ध षडयंत्र रचू शकतात. ज्याचे नुकसान तुम्हाला नोकरीत भोगावे लागेल. करियरमध्ये मनासारखे यश मिळेल. स्थान परिवर्तनासाठी तयार राहा. योजना गुप्त ठेवा.

मकर 
उत्पन्न नक्की वाढेल. मात्र काही आव्हानांना सुद्धा सामोरे जावे लागेल. संततीची चिंता काहीशी जास्त असेल आणि ती आवश्यक सुद्धा आहे कारण त्यांची सोबत आणि आरोग्य दोन्ही बिघडू शकते. मानसिक चिंता आणि तणाव संपेल. करियरमध्ये मोठे यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

कुंभ 
कौटुंबिक जीवन या महिन्यात चढ-उतारात जाईल, कारण दशम स्थानात केतु आणि चतुर्थ स्थानात राहु आणि मंगळची युती तुम्हाला कौटुंबिक आघाडीवर व्यस्त ठेवेल. आई-वडीलांचे आरोग्य सुद्धा चिंतेचा विषय असेल. या काळात कोणत्याही प्रॉपर्टीत हात टाकणे लाभदायक नाही. आरोग्य आणि मानसिक स्थितीकडे लक्ष द्या. कामाचा भार वाढेल

मीन 
या महिन्यात प्रवास करण्यापूर्वी खबरदारी घ्या. प्रवासात एखादी दुखापत होण्याची शक्यता आहे किंवा सामान चोरीस जाण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव वाढू शकतो. नवीन कपडे आणि काही महागड्या आयटमवर खर्च होऊ शकतो. पैसा आणि आरोग्याची समस्या असू शकते. एखाद्या ज्येष्ठ्याच्या सहकार्याने लाभ होईल.