Monthly horoscope : ‘या’ 6 राशींना जूनमध्ये लाभच लाभ ! जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल हा महिना

पोलीसनामा ऑनलाइन – Monthly horoscope : आजपासून नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे. ग्रह-नक्षत्रांच्या मार्गक्रमणानुसार, जून महिना सर्व राशींना खास असणार आहे. ज्योतिषनुसार हा महिना काही राशींसाठी खुपच लाभ घेऊन आला आहे. तर काही जातकांना या महिन्यात सांभाळून राहावे लागेल. काही राशींना या महिन्यात संमिश्र फळांची प्राप्ती होऊ शकते. जाणून घ्या सर्व राशींचे मासिक राशिफळ.

मेष
हा महिना खुपच चांगला आहे. वैयक्तिक जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कठोर मेहनत कराल, याचे फळ मिळेल. सरकारी क्षेत्रातून लाभाचे योग. व्यवसायासाठी स्थिती चांगली. महत्वाचा निर्णय घ्याल, ज्यामुळे लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ. कुटुंबात वाद होऊ शकतो. आई-वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रेम जीवनासाठी उत्तम काळ आहे. विवाहितांसाठी थोडा कठिण काळ, पण स्थिती लवकरच सामान्य होईल. आर्थिक दृष्टिकोणातून महिना खुपच चांगला आहे.

वृषभ –
संमिश्र परिणामांचा महिना आहे. कार्यक्षेत्रात भाग्याची साथ मिळेल. नोकरी पदोन्नतीची शक्यता. रागावर नियंत्रण ठेवा. दूसर्‍यांच्या प्रकरणांपासून दूर रहा. ऑफिसच्या सहकार्‍यांवर अंधविश्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागेल, चढ-उतार येतील. कुटुंबासाठी काळ चांगला. शांतता राहील. नातेवाईकांचे आगमन होईल. प्रेमात वेगळे होण्याच्या स्थितीची शक्यता. दाम्पत्य जीवनात चढ-उतार राहतील. आर्थिक बाबतीत मध्यम काळ. वाहन चालवताना काळजी घ्या.

File photo

मिथुन-
संमिश्र परिणाम मिळतील. करियरसाठी महिना ठिक आहे. नोकरीत प्रमोशन मिळेल. व्यापारासाठी प्रवास कराल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला, एकाग्रता कमी जाणवेल. कौटुंबिक जीवनात काही समस्या येतील, वातावरण बिघडू शकते. प्रेमजीवनासाठी महिना ठीक आहे. आपसातील वादावर नियंत्रण ठेवा. आर्थिक दृष्टिकोणातून संमिश्र आहे. विनाकारण खर्च होऊ शकतात. गुंतवणुकीसाठी चांगला महिना. आरोग्याच्या समस्या जाणवतील.

कर्क –
महिना फारसा खास नाही. प्रत्येक क्षेत्रात कठोर मेहनत करावी लागेल. कर्मठता, कार्यकुशलता वाढेल. वरिष्ठ अधिकार्‍यांशी संबंध बिघडू शकतात. व्यवसायात चढ-उतार राहतील. विद्यार्थ्यांसाठी महिना सामान्य, जास्त मेहनत करावी लागेल. कुटुंबातील वातावरणात चढ-उतार राहील. छोट्या बहिण-भावांना मदत कराल. वडीलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रेम संबंधांसाठी जूनचा महिना आव्हानाचा ठरू शकतो. प्रेमी युगुल एकमेकांना समजून घेतील. खर्चातील वाढीने आर्थिक स्थिती बिघडू शकते.

सिंह-
संमिश्र परिणाम मिळतील. करियरसाठी आव्हानात्मक काळ आहे. विरोधकांपासून सावध रहा. कामावर लक्ष द्या. कार्यक्षेत्रात जास्त प्रयत्न करावे लागतील. कामासाठी परदेशात जावे लागेल. व्यवसायासाठी चांगला काळ. शिक्षणासाठी सुद्धा वेळ चांगली आहे. महिन्याचा प्रारंभ कौटुंबिक जीवनासाठी ठिक नाही. समस्यांची शक्यता. कुटुंबाचे वातावरण खराब राहू शकते. आई-वडीलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग आहेत. प्रेम जीवनासाठी चांगला काळ आहे. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्टिकोणातून महिना चांगला आहे. शनी आणि मंगळच्या गोचरमुळे आरोग्याच्या समस्या जाणवतील.

कन्या-
संमिश्र फलदायक महिना आहे. करियरसाठी चांगला काळ. काम-धंद्यात अनुकूलता राहील. नोकरीत यश मिळेल. पदोन्नती मिळेल. वरिष्ठ अधिकार्‍यांशी संबंध चांगले राहतील. व्यापारात सावध रहा. कुटुंबासाठी वेळ चांगली आहे. आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधात काळ आव्हानाचा आहे. आर्थिक दृष्टिकोणातून वेळ खास नाही. आर्थिक आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य चांगले राहील. योग-व्यायाम आणि ध्यान करणे लाभदायक राहील.

तुळ –
महिना उत्तम आहे. करियरसाठी चांगली वेळ. नोकरी बदलण्यात यश मिळेल. प्रत्येक कामात यश मिळेल. शिक्षणाच्या क्षेत्रासाठी चांगली वेळ आहे. कुटुंब जीवनात चढ-उतार राहील. आई-वडीलांचे आरोग्य बिघडू शकते. प्रेम संबंधांसाठी अनुकूल महिना आहे. दाम्पत्य जीवनासाठी महिन्याची सुरूवात चांगली राहील. आर्थिक दृष्टिकोणातून चांगला काळ. अगोदरच्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. आरोग्य सांभाळा.

वृश्चिक –
संमिश्र महिना आहे. निष्ठा आणि मन लावून काम कराल. नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. व्यापारात पार्टनरशी वाद होऊ शकतो. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून काळ चांगला आहे. एकाग्रता राहील. कुटुंबात शांतता आणि प्रसन्नता राहील. भाऊ-बहिणींशी संबंध चांगले राहतील. घरात शुभकार्य होऊ शकते. प्रेमसंबंधासाठी सामान्य महिना आहे. दाम्पत्य जीवनात चढ-उतार राहतील. आर्थिक बाबतीत संमिश्र फळ मिळेल. आरोग्याच्या काही समस्या होऊ शकतात. दिनचर्या सांभाळा.

धनु –
महिना चांगला आहे. नोकरीत पदोन्नती होईल. कार्यक्षेत्रात आणखी मेहनत करा. नवीन योजनांवर काम करण्याने यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी काळ कठिण आहे. मेहनतीने यश प्राप्त कराल. कुटुंबात चढ-उतार होतील. आईचे आरोग्य त्रास देऊ शकते. प्रेमसंबंधासाठी चांगली वेळ आहे. आर्थिक दृष्टिकोनातून वेळ मध्यम आहे. पात्रता आणि क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा. काही आजार त्रास देऊ शकतात.

मकर –
महिना सामान्य आहे. कार्यक्षेत्रात मेहनतीने यश मिळेल. 22 जूननंतर काळ चांगला आहे. व्यापारात वाढ होईल. शिक्षणासाठी काळ फारसा चांगला नाही. हा महिना कौटुंबिक जीवनासाठी चांगला आहे, सुख-शांती राहील. संपत्तीवरून वाद होऊ शकतो. आईचे आरोग्य त्रास देईल. प्रेमसंबंधासाठी काळ कठीण आहे. धैर्याने काम घ्या. दाम्पत्य जीवनात आव्हानांना तोंड द्यावे लागेल. आर्थिक दृष्टिकोणातून लाभ होणार नाही आणि हानी देखील होणार नाही. मेहनत आणि वैयक्तिक प्रयत्नातून पैशांची बचत कराल. आरोग्य चांगले राहील. परंतु निष्काळजीपण करू नका.

कुंभ –
कुंभसाठी जून महिना फार चांगला नाही. कार्यक्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. व्यापारासाठी सुद्धा काळ चांगला नाही. मात्र, 15 जूनपासून स्थिती सुधारेल. शिक्षणासाठी चांगला काळ आहे. कौटुंबिक जीवनासाठी वेळ चांगली नाही, भांडणे होऊ शकतात. धैर्यासह प्रकरणे सोडवावीत. प्रेमसंबंधासाठी वेळ अनुकूल आहे. खर्चात वाढ होईल. आरोग्य मध्यम राहील. पायाला दुखापत होऊ शकते. हवामानाशी संबंधीत आजार होऊ शकतो.

मीन –
जून महिना खुप फलदायक आहे. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. वरिष्ठ अधिकार्‍यांशी संबंध चांगले राहतील, लाभ मिळेल. व्यवसायाठी काळ चांगला. विद्यार्थ्यांसाठी वेळ खास नाही, अडचणी येतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. आई-वडीलांची तब्येत चांगली राहील. प्रेमसंबंधासाठी वेळ नाजूक आहे. नात्यात प्रामाणिक रहा. आर्थिक दृष्टिकोणातून चांगला काळ आहे. पैशाशी संबंधीत योजनांमध्ये अडथळा येऊ शकतो, परंतु आर्थिक स्थितवर परिणाम होणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने महिना ठिक आहे.

17 सप्टेंबर राशिफळ : मीन | horoscope today 17 september 2020 : Pisces

READ ALSO THIS :

US : महिलेकडे सापडले असे ड्रग्स जे 10 लाख लोकांचा जीव घेऊ शकते

7 लाखांच्या रूग्णवाहिकेची तब्बल 21 लाखांत खरेदी, जाणून घ्या प्रकरण


400 कोटींचा घोटाळा ! शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना अखेर रद्द; ठेवीदारांना 5 लाख मिळण्याचा मार्ग मोकळा, जाणून घ्या कसा