मासिक राशीफळ : ऑक्टोबरचा महिना ‘या’ 6 राशींसाठी खास, ‘या’ राशींना राहावे लागेल सावध

आजपासून ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. या महिन्यात अनेक ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहेत. अंक आणि ग्रहांच्या संयोगाचा प्रत्येक राशीवर प्रभाव पडतो. हा महिना कोणत्या राशींसाठी खुशखबर घेऊन येणार आहे आणि कोणत्या राशींनी या महिन्यात अंकों और ग्रहों के संयोग का हर राशि पर पड़ता है. आइए जानते हैं कि ये महीना किन राशि वालों के लिए खुशखबरी लेकर आया है और किन राशि वालों को इस महीने सावधान रहने की जरूरत है.

मेष
ऑक्टोबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक आहे. या महिन्यात अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे, याचा राशीवर परिणाम होणार आहे. या महिन्यात आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल. थोडीसा निष्काळजीपणा मोठा महागात पडू शकतो. व्यवसायात भागीदाराशी काही वाद-विवाद होऊ शकतात, ज्यामुळे व्यवसायात तोटासुद्धा होऊ शकतो. या महिन्यात करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सावधगिरी बाळगावी लागेल. तथापि, कौटुंबिक जीवनासाठी हा महिना चांगला ठरणार आहे.

वृषभ
या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना सामान्य आहे. ग्रहांचे परिवर्तन शिक्षण आणि प्रेम प्रकरणांवर परिणाम करेल. मोठ्या बहिण-भावांसोबतचे संबंध सुधारतील. या महिन्यात करिअरच्या क्षेत्रात वृषभ राशीच्या लोकांना यश मिळण्याची आशा आहे. आर्थिक बाजू सामान्य असेल. या महिन्यात स्वतासह घरातील इतर सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा महिना चांगला असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. या महिन्यात प्रेम प्रकरणात बरेच चढ-उतार शकतात.

मिथुन
मिथुन राशीसाठी ऑक्टोबर महिना खूप चांगला आहे. या महिन्यात वैयक्तिक आयुष्यात चांगले परिणाम मिळतील. ज्यामुळे कार्यक्षेत्रातही चांगली कामगिरी करू शकाल. घरातील इतर सदस्यांचीही नोकरीत प्रगती होऊ शकते, ज्यामुळे घराचे वातावरण चांगले राहील. विद्यार्थ्यांना कुटुंबातील सदस्यांकडून शिक्षणाच्या क्षेत्रात संपूर्ण मदत मिळेल. या राशीच्या अनेक नोकरदार लोकांना मनासारख्या ठिकाणी बदली मिळून शकते, ज्यामुळे अनेक मानसिक त्रासांवर मात करता येईल.

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना आनंदाचा आहे. या महिन्यात आपले धैर्य आणि शक्ती वाढेल. आईशी संबंध सुधारतील. या महिन्यात तुमचा कल धार्मिक कार्याकडेही असेल. करिअरच्या क्षेत्रात या राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळतील. या महिन्यात तुमची आर्थिक बाजूही चांगली असेल. कौटुंबिक जीवनात सुखद अनुभवही येतील. वयाची 50 शी वर्षी ओलांडलेल्या लोकांनी आरोग्याबद्दल थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

सिंह
सिंह ही अग्नि तत्वाची राशी आहे आणि या राशीचे लोक दृढ इच्छाशक्तीचे असतात. या दृढ इच्छशक्तीच्या बळावर या महिन्यात बरेच सकारात्मक बदल घडवून आणू शकता. या महिन्यात आपले संभाषण कौशल्य, पैसा आणि कुटुंबाच्या बाबतीत सुधारणा होईल. या महिन्यात वाणीच्याआधारे कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळवाल. उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. करिअरच्या क्षेत्रात चांगल्या बदलाची वाट पाहत होता तो या महिन्यात होऊ शकतो. खर्च नियंत्रित करण्याची गरज आहे.

कन्या
सहनशीलता व धैर्यामुळे या महिन्यात जीवनाच्या अनेक क्षेत्रांत यश मिळेल. या महिन्यात तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल आणि कार्यक्षेत्रातही चांगले काम करण्यास सक्षम असाल. या महिन्यात तुमचे उत्पन्नही वाढू शकते. आर्थिक बाजू चांगली असेल. कौटुंबिक जीवनातही चांगले फळ मिळेल. विद्यार्थ्यांना या महिन्यात खुप अभ्यास करावा लागेल, तरच चांगले परिणाम मिळतील. या महिन्यात विवाहित व्यक्तींना जोडीदाराचा संपूर्ण आधार मिळेल. व्यवसायात नफा मिळू शकतो.

तुळ
तूळ राशीचे लोक खूप कल्पक असतात आणि खुप विचारपूर्वक कोणतेही पाऊल उचलतात. तथापि, या महिन्यात जितका विचार कराल त्यापेक्षा जास्त काम करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच आयुष्यात पुढे जाऊ शकता. या महिन्यात तुम्हाला कार्यक्षेत्रात खूप सावधगिरीने वाटचाल करावी लागेल. शत्रू आपल्याविरूद्ध कट रचू शकतात. कौटुंबिक जीवनातही काही अडचणी येऊ शकतात. तथापि, हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. या महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कोणताही जुनाट आजार पुन्हा येऊ शकतो.

वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी हा महिना शुभ फलदायी असण्याची पूर्ण आशा आहे. या महिन्यात कौशल्याच्या बळावर कार्यक्षेत्रात चांगली फलप्राप्ती कराल. आर्थिक स्थिती देखील चांगली होईल. या महिन्यात कौटुंबिक जीवनाची स्थिती देखील सुधारू शकते. घरातील सदस्यांमध्ये समन्वय वाढेल. घरातील सदस्यांमध्ये सुरू असलेला वाद संपेल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूप चांगला ठरणार आहे. जर आपण एखाद्या स्पर्धेत भाग घेत असाल तर एकाग्रतेच्या आधारावर यश मिळवू शकता.

धनु
या राशीचे लोक उत्साही असतात आणि त्यांच्यात नेतृत्व क्षमता असते. तथापि, अनेकदा घाईघाईने निर्णय घेतल्याने या लोकांना पश्चातपा सुद्धा होतो. या महिन्यातही आपण असे काही निर्णय घेऊ शकता, ज्यांचे भविष्यात वाईट परिणाम होऊ शकतात. या महिन्यात वडीलधार्‍यांचा सल्ला घेतल्यानंतरच निर्णय घ्या. करिअरच्या क्षेत्रात खूप मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक क्षेत्र सामान्य राहील. कौटुंबिक जीवनातही तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. आरोग्यानुसार हा महिना चांगला आहे. एखाद्या जुन्या आजारातून मुक्तता मिळू शकते.

मकर
या महिन्यात मकर राशीचे लोक अध्यात्माकडे झुकतील. तसेच धैर्य आणि शक्ती वाढेल. या महिन्यात कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. कामाची शैलीचा बॉसवर परिणाम होईल. या महिन्यात धार्मिक कामात पैसे खर्च कराल. या राशीतील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात खुप मेहनत करण्याची आवश्यकता आहे. या महिन्यात प्रेम आणि विवाहित जीवन सामान्य असेल. या राशीच्या लोकांना या महिन्यात खांदा दुखण्याची समस्या होऊ शकते. कामातून थोडाा वेळ काढून आराम सुद्धा करा.

कुंभ
या राशीचे लोक खूप मेहनती असतात. मात्र, या महिन्यात तुम्हाला मेहनतीचे संपूर्ण फळ मिळणार नाहीत. या महिन्यात करिअरच्या क्षेत्रात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक स्थितीही फारशी चांगली राहणार नाही. या महिन्यात विचारपूर्वक वाटचाल करावी लागेल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर या महिन्यात वडिलांसोबत वेळ घालवला पाहिजे. जे लोक दीर्घ आजाराने त्रस्त आहेत त्यांनी डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्यावी.

मीन
या राशीचे लोक खूप भावनिक असतात आणि कधीकधी त्यांच्या भावना त्यांच्यासाठी त्रासाचे कारण ठरतात. या महिन्यात भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची आवश्यकता आहे. करिअरच्या क्षेत्रात या महिन्यात सामान्य परिणाम मिळतील. आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी या महिन्यात खूप मेहनत करावी लागेल. या महिन्यात जोडीदारासोबत खुप चांगला वेळ घालवू शकता. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like