दर महिन्याला भरघोस ‘कमाई’ हवीयं मग करा अशी गुंतवणूक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही निवृत्तीनंतरचा विचार करुन आतापासूनच गुंतवणूक करु इच्छित असाल तर तुम्हाला मंथली इन्कम योजनेबाबत माहिती असणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या योजना पोस्ट ऑफिस, बँक, म्यूच्युअल फंड्समध्ये असतात, ज्यात तुम्ही गुंतवणूक करुन निवृत्तीनंतर त्याचा परतावा मिळवू शकतात.

1. फिक्स डिपॉजिट MIS –
तुम्ही दरमहा बँकेच्या FD मधून पैसे मिळवू शकतात. बँक तुम्हाला त्यांच्या व्याजदराप्रमाणे ही रक्कम देते. अनेकांना FD बद्दलची लॉंर्ग टर्म ही एकच योजना माहिती असते. परंतू तुम्ही भविष्यात देखील दरमहा यातून उत्पन्न मिळवू शकतात. अनेक बँका FD च्या ठेवीवर दर महिन्याला उत्पन्न देतात. यातून तुम्ही मंथली इन्कम कमावू शकतात.

ही मंथली इन्कम डिपॉजिट योजना साधारणता: फिक्स डिपॉझिट सारखीच असते. यात व्याज जमा करण्याची पद्धत वेगळी असते. परंतू अनेक बँका महिना, तीन महिने, सहा महिने या कालावधीने व्याज देण्याची सुविधा देतात.

2. म्युच्यूअल फंड SWP –
सिस्टिमॅटिक विड्राल प्लॅन असे या योजनेचे नाव आहे. यासाठी तुम्हाला आधी म्युच्यूअल फंडात पैसे गुंतवावे लागतील. ते तुम्ही SIP द्वारे गुंतवू शकतात. ही रक्कम तुम्ही दरमहा काढू शकतात. ते कधी काढायचे यासाठी देखील प्लॅन करता येतो.

3. पोस्ट ऑफिस MIS –
भविष्यातील गुंतवणूकीसाठी पोस्ट ऑफिसची ही योजना अत्यंत लाभकारक आहे. याची मॅच्युरिटी 5 वर्षांची असते, यात 1 किंवा 2 ते 3 व्यक्ती पैसे गुंतवू शकतात ही याची विशेषता आहे. तुम्ही यात सिंगल खाते सुरु केले तर 1500 ते 4 – 5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. जॉइंट खाते असल्यास 9 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते.

आरोग्यविषयक वृत्त –