Masik Rashifal 2021 : ‘या’ 4 राशींसाठी लकी आहे मार्च, जाणून घ्या तुमच्या राशीची काय असेल स्थिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Masik Rashifal 2021 : 2021 चा तिसरा महिना सुरु झाला आहे. मार्च महिना ग्रहांच्या चालीनुसार सर्व राशींसाठी खुपच खास असणार आहे. ज्योतिषतज्ज्ञांनुसार, मेष, तुळ, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या जातकांसाठी वर्षाचा तिसरा महिना अतिशय शुभ ठरणार आहे.

मेष –
उत्साह आणि ऊर्जेने भरलेला मार्च महिना मेष राशीच्या जातकांसाठी नवीन भरारी आणि नवी स्वप्नं घेऊन आला आहे. या महिन्यात तुमच्याकडे आश्चर्यकारक सकारात्मक उर्जा असेल, जी वैयक्तिक आणि व्यवसायिक दोन्हीसाठी चांगली बातमी घेऊन येणार आहे. कुटुंबाचे संपूर्ण सहकार्य मिळेल आणि या महिन्यात खर्चापेक्षा बचतीवर जास्त विचार कराल.

वृषभ –
आराम आणि स्वादिष्ट पदार्थांची आवड असलेल्या वृषभ राशीच्या जातकांसाठी मार्च महीना संमिश्र परिणाम घेऊन आला आहे. मार्च महिन्यात नोकरी आणि पैशाच्या थोड्या समस्या येऊ शकतात. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. शिक्षणक्षेत्र किंवा शिक्षण घेत असलेल्या जातकांना या महिन्यात चांगली बातमी समजेल.

मिथुन –
निष्ठावंत आणि नाती पाळणार्‍या मिथुन राशीच्या जातकांसाठी मार्च महिना चांगला असणार आहे, या दरम्यान जिज्ञासा जास्त असेल. नोकरीत यश पायाशी लोळण घेईल. एखादी खास व्यक्ती तुमच्या जीवनात येऊ शकते. या महिन्यात तुम्ही गरजेपेक्षा जास्त विचार केल्याने मानसिकदृष्ट्या थोडे अस्वस्थ होऊ शकता.

कर्क –
भावनिक आणि अतिशय संवेदनशील कर्क राशीच्या जातकांसाठी मार्च महिना संमिश्र परिणाम घेऊन आला आहे. या महिन्यात कामानिमित्त अनेक प्रवास करावे लागतील. मात्र, जास्त व्यस्त राहिल्याने कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकणार नाहीत. ज्यामुळे तुम्हाला नात्यात थोड्या नाजूक स्थितीचा सामना करावा लागू शकतो.

सिंह –
वाघासारख्या निर्भीड, वीर आणि पराक्रमी सिंह राशिच्या जातकांना मार्च महिना थोडा आव्हानांचा आहे. मार्च महिन्यात उत्साह भरपूर असेल. हा उत्साह त्यांच्या व्यवसायिक जीवनासाठी चांगला ठरणार आहे. परंतु प्रेमाच्या द़ृष्टीने या महिन्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

कन्या –
कुशल आणि व्यावहारिक कन्या राशीच्या जातकांसाठी मार्च महिना संमिश्र परिणाम घेऊन आला आहे. वैवाहिक जीवनात थोड्या समस्यांचा सामाना करावा लागू शकतो. परंतु, काही काळातच तुम्ही नाती पुन्हा चांगली करू शकता. या महिन्यात खर्चावर जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.

तुळ –
जीवनात सामंजस्य आणि संतुलन कायम राखणार्‍या तुळ राशीच्या जातकांसाठी मार्च महिना अतिशय शुभ ठरणार आहे. व्यापारात लाभ प्राप्त होईल, परंतु व्यापारात विस्तार करण्यापूर्वी खुप विचार करावा लागेल. या महिन्यात तणावमुक्त जीवन जगणार आहात, आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

वृश्चिक –
दंबग आणि उत्साही व्यक्तीमत्वाच्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मार्च महिना अतिशय शानदार आहे. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. करियरच्या दृष्टीने सुद्धा मार्च महिना तुमच्यासाठी अतिशय खास असणार आहे. या महिन्यात आरोग्याच्या बाबतीत थोडे सतर्क रहावे लागेल.

धनु –
धनु राशीच्या जातकांसाठी मार्च महिना संमिश्र परिणाम देणारा आहे. प्रेमात पडलेल्या जातकांसाठी काळ थोडा आव्हानांचा आहे, परंतु कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. करियरच्या दृष्टीने महिना शुभ आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहण्याची आवश्यकता आहे.

मकर –
न्याय प्रिय आणि मेहनती मकर राशीच्या जातकांसाठी मार्च महिना काही खास असणार नाही. करियरच्या दृष्टीने चांगली बातमी मिळू शकते. नात्यात या दरम्यान कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत अतिशय सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

कुंभ –
कुंभ राशीच्या जातकांसाठी मार्च महिना अतिशय शानदार आहे. करियरच्या दृष्टीने नवी उंची गाठाल. नात्यात सुद्धा एका नवीन उर्जेचा संचार होईल, शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा विद्यार्थी जातकांना चांगली बातमी मिळू शकते.

मीन –
स्वप्न आणि वास्तविकता यातील अंतर माहित असलेल्या मीन राशीच्या जातकांसाठी मार्च महिना संमिश्र परिणाम घेऊन आला आहे. कुटुंबात वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे वागण्यात थोडी उदासीनता जाणवू शकते. मार्च महिन्यात तुमचे आरोग्य एकदम फिट राहिल.