Mood Swings |’मूड स्विंग’मुळं नात्यामध्ये आणि कामावर वाईट परिणाम होतोय, तर मग करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये अनेकांना स्वत:साठी वेळंच नसतो. या धावत्या जगात टिकवून राहण्यासाठी रोज प्रयत्न करावे लागतात. (Mood Swings) या सगळ्यामध्ये आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं विसरून जातो. तसेच आपल्याला माहित असेल, की हल्ली मूड स्विग (Mood Swings) होण्याचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. म्हणजे एका गोष्टीवर आपण फार वेळ टिकवून किंवा त्या गोष्टीसोबत नाही घालवू शकत. हे प्रमाण जास्त करून १८ ते २५ वयोगटातील मुला-मुलींमध्ये पाहायला मिळते. तर आजआम्ही समस्येबद्दलचा उपाय सांगणार आहोत. जेणेकरून त्याचा परिणाम तुमच्या बाकीच्या गोष्टींकडे होऊ नये (Follow These Tips To Control Mood Swings).

 

– मूड स्विंग लक्षणे (Mood Swing Symptoms)
विनाकारण उदास वाटणे, उर्जेचा अभाव, सक्रिय नसणे, इच्छा नसणे, चिडचिडेपणा, आत्मविश्वासाचा अभाव, सतत थकवा जाणवणे, खूप भूक लागणे, दम लागणे इत्यादी सर्व मूड स्विंगची लक्षणे आहेत. (Mood Swings)

 

– निरोगी आहार (Healthy Diet)
आपल्या आहारात कमी साखर आणि कमी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुमची मूड स्विंगची समस्या दूर होऊशकते. त्यासाठी जास्त साखर आणि मीठ न घेणे.

 

– झोप (Sleep)
दररोज ८ तासांची झोप घेणे खूप महत्वाचे आहे. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते आणि तुमचा मूडही चांगला राहील. पुरेशी झोप घेतल्याने तुम्हाला दिवसभर सक्रिय आणि आनंदी वाटेल.

– व्यायाम (Exercise)
मूड सुधारण्यासाठी व्यायामापेक्षा काहीही चांगले नाही. त्याच्या मदतीने, तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते आणि तुम्ही तुमचे हार्मोन्सचे संतुलनही योग्य राहील.

 

– संगीत (Song)
तुम्ही स्वतःला शांत करू शकत नसल्यास, संगीत ऐकणे हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. यामुळे तुम्ही शांत व्हाल आणि तुमची मूड स्विंगची समस्याही दूर होईल.

 

– पाणी पिणे (Drinking Water)
मूड स्विंगची समस्या टाळण्यासाठी शरीरासाठी हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीरातील विषारी घटक सहज बाहेर पडू शकतात.

 

– नृत्य (Dance)
मूड सुधारण्यासाठी, तुम्ही व्यायामाऐवजी नृत्यही करू शकता. त्यासाठी तुमचे आवडते गाणे वाजवा आणि
तुम्हाला हवे तसे नृत्य करा. यामुळे शरीरात ऊर्जा येईल आणि खराब मूड लगेच चांगला होईल.

– नकारात्मक लोकांपासून दूर रहा (Stay Away From Negative People)
मूड चांगला नसेल तर नकारात्मक स्वभावाच्या लोकांपासून दूर राहा. असे लोक स्वतःला कधीच बदलू शकत नाहीत.
ते सतत इतरांचे वाईट करत राहतात. अशा लोकांमुळे तुमचा मूड चांगला होण्याऐवजी खराब होऊ शकतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
\त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Mood Swings | follow these tips to control mood swings

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Black Pepper Benefits | काळी मिरी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

 

Weight Loss | ‘या’ ज्यूसचे सेवन करून, पोटाची चरबी करा कमी; जाणून घ्या