पुढच्या वर्षापर्यंत चीन-ब्राझील-रशिया सारख्या विकसनशील देशांच्या तुलनेत भारतावर सर्वाधिक असणार कर्ज – रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगातील मोठी रेटिंग एजेंसी असणाऱ्या मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसच्या रिपोर्टनुसार 2021 या वर्षात भारतावर सर्वात अधिक कर्ज होण्याची शक्यता आहे. कोरोना संकटामुळे जीडीपी ग्रोथ कमी झाला आणि मोठ्या आर्थिक नुसानामुळे याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे.

किती वाढणार कर्ज

सोमवारी रात्री आलेल्या जीडीपीच्या आकडेवारीनुसार चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात जीडीपी मध्ये 24 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. मूडीजच्या मते अभरत्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या प्राथमिक नुकसानामुळे भारताच्या कर्जात 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये 10 टक्क्यांची वाढ होऊ शकते.

भारतात सरकारी बँकांची वाईट अवस्था

रेटिंग एजन्सीने सांगितलं की भारतातील सरकारी बँकांची अवस्था वाईट आहे ज्यांची बँकिंग सिस्टम ऍसेटमध्ये 70 टक्क्यांची भागीदारी आहे. अमेरिकन रेटिंग एजन्सीने सांगितलं, भारतात मध्यम कालावधी ग्रोथ आणि राजकोषीय तूट ही पुढे जोखीम असल्याचा संकेत देत आहे. यातून असं समजतं की येणाऱ्या काळात सरकारचे उत्पन्न कमी होऊ शकते.

मूडीजने सांगितलं, यापैकी काहींवर व्याजाचा बोजा वाढेल त्यामुळे विकसित देशांवर कर्जाचा भर वाढू शकतो. येणाऱ्या काळात ब्राझील, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यावरील कर्जाचा बोजा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

मूडीजने सांगितलं की कमजोर फायनान्शियल सिस्टम आणि दयावा लागलेला आकस्मिक निधी यामुळे भारत, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की यांच्यासाठी कर्जाची ही जोखीम अधिक आहे. एजन्सीने सांगितलं भारताच्या वित्तीय सिस्टमवर दबाव वाढल्यामुळे जोखीम अजूनच वाढू शकते. भारतातील बँका वाढत्या एनपीएच्या समस्यांशी लढत आहेत.