Moody’s Rating | प्रमुख सरकारी बँकाबाबत मोठी घोषणा; जाणून घ्या काय आहे घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Moody’s Rating | भारतातील प्रमुख बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), अशा अनेक सरकारी बँकांसंदर्भातील ही बातमी आहे. जर तुमचे खाते या सरकारी बँकांमध्ये असेल तर तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे आहे. एसबीआय, पीएनबी, कॅनरा बँक (Canara Bank) आणि बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) या देशातील प्रमुख बँकांच्या रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे. बँकांसाठीच्या रेटिंग एजन्सी असलेल्या मूडीज् ने (Moody’s Rating) यासंदर्भातली माहिती आज दिली.

 

जाणून घ्या काय आहे मूडीज् नुसार एसबीआयचे रेटिंग :
मूडीज इनव्हेस्टर्स सर्व्हिस’ने (Moody’s Investors Service) नुकतच जारी केलेल्या एका पत्रकामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकेचे डिपॉझिट रेटींग (Bank Deposit Ratings) मागील काही काळापासून स्थिर असल्याचं म्हटलं आहे. ‘मूडीज’ ने ‘एसबीआय’ ला दिर्घकालीन स्थानिक आणि परदेशी मुद्रा बँक डिपॉझिट रेटिंग ‘बीएएथ्री’ (BAA3) कायम ठेवलं आहे. तर बाकी तीन सार्वजनिक बँकांचं दीर्घकालीन बँक डिपॉझिट रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे.

 

या सोबतच इतरही बँकांची रेटिंग यावेळी जाहीर करण्यात आली. ‘एसबीआय’ च्या दीर्घकालीन बँक डिपॉझिट रेटिंगला ‘बीएएथ्री’ (BAA3) असलं तरी आता बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक तसेच ‘पीएनबी’ सारख्या दीर्घकालीन बँक डिपॉझिट रेटिंग बीएएवन (BAA1) वरुन बीएएथ्री (BAA3) करण्यात आलं आहे. सार्वजनिक बँकांच्या डिपॉझिट रेटिंगमध्ये झालेली ही सुधारणा आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचं सूचित करते असं म्हटलं जात आहे. यामधून गरज पडल्यास या बँकांना उच्च पातळीवरी सरकारी मदत मिळू शकते असंही दर्शवलं जात आहे.

तसेच, मूडीजने (Moody’s Rating) केलेल्या सर्वेनुसार कर्जासंबंधी बँकांची परिस्थिती सुधारल्याचे देखील समोर आले आहे.
‘मूडीज बँक डिपॉझिट रेटिंग’ कोणत्याची बँकेची परकीय आणि देशांतर्गत चलन आणि ठेवींसंदर्भातील बंधने वेळेवर पूर्ण करण्याची क्षमता दर्शवते.
भारतामध्ये कर्जासंदर्भातील परिस्थिती हळूहळू सुधरत असून, किरकोळ कर्जासंदर्भात भारतीय बँकांनी बरीच सुधारणा केल्याचं ‘मूडीज’ने म्हटलं आहे.
भारतामधील कंपन्याची परिस्थिती अधिक सुधारलेली आहे. लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्या बँकांच्या मालमत्तेसंदर्भातील गुणवत्तेला धोका निर्माण करत आहेत.

 

दरम्यान, भारताच्या आर्थिक विकासावर मंदीचा परिणाम होईल. मात्र भारतीय अर्थव्यवस्था इतर बाजारपेठांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करेल. आणि त्यामुळे बँकांसाठी सकारात्मक वातावरण तयार होईल. असंही मूडीज् ने म्हटलं आहे.

 

येत्या एक ते दीड वर्षांमध्ये बँकांची स्थिती आणि गुणवत्ता चांगली राहील.
यामध्ये अनुकूल वातावरणाबरोबरच कंपन्यांच्या बाजूने देखील सकारात्मक परिस्थिती राहिल.
असं देखील मूडीजच्या अहवालात स्पष्ट केले आहे.

 

Web Title :- Moody’s Rating | moody upgrades ratings of pnb bob canara bank affirms sbi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना