Moolani’s Eye Care Centre | मुलानी आय केअर सेंटरच्या वतीने काचबिंदू जागृतीसाठी सायकल रॅली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Moolani’s Eye Care Centre | जागतिक काचबिंदू सप्ताहाचे (World Glaucoma Week) औचित्य साधून पुण्यातील मुलानी आय केअर सेंटरच्या वतीने काचबिंदू जागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन केले होते. लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम (Sr PI Ashok Kadam) व ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अशोक मुलानी (Dr. Ashok Mulani) यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून रॅलीला सुरुवात झाली. (Moolani’s Eye Care Centre)

सेंटरच्या प्रमुख आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. समिता मूलानी-कटारा यांच्या नेतृत्वात ही सायकल रॅली एमजी रस्ता, कॅम्प, आंबेडकर, पूना लेडीज क्लब, पुलगेट आदी भागात काढण्यात आली. मुलानी आय केअर सेंटरचे डॉक्टर्स, कर्मचारी, स्वयंसेवक, विद्यार्थी, तसेच लष्कर पोलीस ठाण्यातील (Lashkar Police Station) पोलीस कर्मचारी या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. (Moolani’s Eye Care Centre)

जवळपास ५५ सायकलस्वारांनी काचबिंदूबाबत जागृतीपर घोषणा देत, पॅम्प्लेट वाटत नियमित डोळ्यांची तपासणी करण्याचे आवाहन केले. तसेच मुलानी आय केअर सेंटरतर्फे १३ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून एमजी रस्त्यावरील मुलानी आय केअर सेंटरमध्ये आयोजिलेल्या मोफत काचबिंदू तपासणी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले.

डॉ. समिता मुलानी-कटारा (Dr Samita Moolani Katara) म्हणाल्या, “यंदा १२ ते १८ मार्च २०२३ या कालावधीत जागतिक काचबिंदू सप्ताह राबविण्यात येत आहे.
काचबिंदू तपासणी आणि जनजागृती करण्यासाठी मुलानी आय केअर सेंटरच्या वतीने ही सायकल रॅली काढण्यात आली.
आज काचबिंदूमुळे अनेक लोकांना अंधत्व आले आहे. भारतात कोट्यवधी लोक काचबिंदूने ग्रासलेले आहेत.
पण योग्य काळजी आणि उपचार घेतले तर काचबिंदूसारख्या आजारांना आपण दूर ठेवू शकतो.
काचबिंदूची तपासणी नेत्ररोग तज्ज्ञांच्या निगराणीखाली व्हायला हवी.”

 

Web Title :- Moolani’s Eye Care Center | Cycle Rally for Glaucoma Awareness on behalf of Mulaney Eye Care Centre

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IND vs AUS | ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करून विराट कोहलीने केला ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज

Vinay Aranha In ED Custody | विद्यार्थ्यांकडून भरमसाट फी घेणार्‍या विनय अरान्हाने उधळले बॉलीवूड स्टारवर पैसे; अनेक कारनामे ‘बाहेर’

Devendra Fadnavis | नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस