‘कफ’, ‘पित्त’ आणि रक्तासंबंधी विकारात खूपच उपुयक्त ठरतात मूग ! जाणून घ्या इतर फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मूग आपल्याला 3 प्रकारात आढळून येतो. हिरवा, पिवळा आणि काळा. यापैकी हिरवा मूग (moong dal) हा सर्वश्रेष्ठ आहे. मूग थंड गुणाचा आणि पचायला हलका असतो. व्हिटॅमिन ए, बी, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस अशी शरीराला आवश्यक पोषकघटक मुगाच्या टरफल्यात भरपूर प्रमाणात असतात. मुगाचे आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

मूग हे कफ, पित्त आणि रक्तासंबंधित विकारात फार उपयुक्त आहेत. मूग क्वचित पोटात वायू उत्पन्न करतात. मुगाबरोबर हिंग, मिरी यांचा वापर करावा. मुगाचं पिठलं, संबंध मूग कढण, उसळ, आमटी, पापड, लाडू, खीर अशा विविध प्रकारे मूग उपयुक्त ठरतात. ज्वरामध्ये मुगाच्या किंवा रानमुगाच्या पानांचा काढा प्यावा. जीर्णज्वरात ताकद भरून येण्यासाठी आणि चांगली झोप येण्यासाठी मुगाच्या पानांचा काढा उपयुक्त आहे.

पिवळ्या मुगात लवकर भुंगे होतात. अशा मुगाला लवकर कीड लागते. कदाचित हेच कारण असावं की, पिवळ्या मुगाची पैदास खूपच कमी आहे. पिवळ्या मुग पिवळ्या मुगाला हिरव्या मुगाची सर येत नाही. पिवळ्या मुगाचं भाजून तयार केलेलं पीठ खूप पौष्टीक असतं. थोडी पिठीसाखर आणि चांगल्या तुपावर परतलेलं पिवळ्या मुगाचं पीठ हे खूप पौष्टीक आणि उत्तम टॉनिक आहे.

कृश असणारी मुलं आणि जे दुपारी उशिरा जेवण करतात अशांनी सकाळी चहाऐवजी चांगल्या तुपावर भाजलेले मुगाच्या पीठाचे लाडू खावेत. बाळंत स्त्रीला जर दूध येत नसेल तर मुगाच्या पीठाचे लाडू खायला द्यावेत. यानं तात्काळ फरक दिसून येईल. जे लोक खूप शारीरिक कष्ट करतात त्यांनी रोज किमान एक वाटी मुगाची उसळ खावी. जे लठ्ठपणानं परेशान आहेत त्यांनी नियमित मुगाची आमटी खावी. मुगामुळं मेद वाढत नाही, तर उलट स्नायूंना बळ मिळतं.

संधीवात, अर्धांगवायू, आमवात, आम्लपित्त, अल्सर, डोकेदुखी, तोंड येणं, त्वचेचे विकार, कावीळ, जोलदर, सर्दी पडसं, खोकला, दमा, स्वरभंग या तक्रारींवर मूग अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक पदार्थ आहे. त्यासाठी मूग भाजून त्याचे नुसते पाणी किंवा कढण हे अंधार्गवात, मधुमेह, रक्तदाबवृद्धी या विकारात उपयुक्त ठरतं.

घशाच्या, जिभेच्या, गळ्याच्या कॅन्सरच्या विकारात जेव्हा अन्न किंवा पाणी गिळणं त्रासाचं होतं त्यावेळी हिरवे मूग उकळून त्याचे पाणी पुन्हा पुन्हा पुन्हा पाजावे. शरीर तग धरतं. नुसत्या मुगाच्या पाण्यावर माणसं कॅन्सरवर मात करू शकतात. मधुमेहात भरपूर मूग खावेत. थकवा येत नाही.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.