Moonlighting | इथं नोकरीशिवाय इतर कामांवर बॅन, TCS-Infosys सारख्या कंपन्यांच्या ऑफर लेटरचे सत्य!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Moonlighting | आयटी इंडस्ट्रीत (IT Industry) सध्या ’मूनलाइटिंग’ (Moonlighting) टर्म हा शब्द चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. बड्या आयटी कंपन्यांच्या सीईओंसह वरिष्ठ अधिकार्‍यांनीही या वादात उडी घेतली आहे. एकीकडे विप्रो (Wipro) चे कार्यकारी अध्यक्ष रिशद प्रेमजी (Rishad Premji) आणि टीसीएस (TCS) चे कार्यकारी संचालक एन गणपथी सुब्रमण्यम (N Ganapathi Subramaniam) यांच्यासारखे लोक आहेत, ज्यांना मूनलाइटिंग अनैतिक वाटते. दुसरीकडे, इन्फोसिस (Infosys) चे माजी संचालक मोहनदास पै (Mohandas Pai) आणि टेक महिंद्रा (Tech Mahindra) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सीपी गुरनानी (CP Gurnani) यांच्यासारखे दिग्गज आहेत, जे मूनलाईटिंगला चुकीचे मानत नाहीत.

 

बिझनेस टुडेने या संदर्भात प्रमुख आयटी कंपन्यांच्या ’जॉब कॉन्ट्रॅक्ट्स’ची छाननी केली. तपास करण्याचे हे कारण होते की, कंपन्यांच्या करारात मूनलाइटिंगबद्दल म्हणजे ’एका कंपनीत पूर्णवेळ काम करताना दुसर्‍या कंपनीचे किंवा पार्टीचे दुसरे स्वतंत्र काम करण्याबाबत काय म्हटले आहे. (Moonlighting)

 

टीसीएस (TCS) :
भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस आपल्या कर्मचार्‍यांना इतर कोणतेही काम करू देत नाही. जर एखाद्या कर्मचार्‍याला तसे करायचे असेल, तर कंपनीकडून आगाऊ लेखी मान्यता मिळवणे हाच एकमेव मार्ग आहे. एखाद्या कर्मचार्‍याने तसे केले नाही तर त्याची नोकरी जाईल. कंपनीचे सीईओ आणि कार्यकारी संचालक गणपति सुब्रमण्यम यांनी बिझनेस टुडे इव्हेंटमध्ये सांगितले होते की मूनलाईटिंगमुळे तात्काळ फायदा होतो, परंतु नंतर कर्मचार्‍यांचे नुकसान होते.

इन्फोसिस (Infosys) :
देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिस देखील मूनलाइटिंगला परवानगी देत नाही. कंपनीने अटी व शर्तींमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, तुम्ही सहमत आहात की इन्फोसिसच्या संमतीशिवाय तुम्ही कोणत्याही पूर्णवेळ किंवा अर्धवेळ नोकरीत सहभागी होणार नाही, कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात कार्यरत संस्थांमध्ये संचालक किंवा भागीदार बनणार नाही. मात्र, कंपनीचे माजी संचालक मोहनदास पै हे मूनलाइटिंगला अजिबात चुकीचे मानत नाहीत. कंपनीच्या कामाच्या तासांनंतर कर्मचारी काय करतो, ही त्याची निवड असते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी, इन्फोसिसच्या करारामध्ये अशीही अट आहे की, नोकरी सोडल्यानंतर कर्मचारी पुढील 06 महिने प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये काम करू शकत नाहीत. या कंपन्यांच्या नावांमध्ये TCS, Accenture, IBM, Cognizant, Wipro यांचा समावेश आहे.

 

विप्रो (Wipro) :
विप्रोच्या नियुक्ती पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की कर्मचार्‍यांना केवळ कंपनीसाठी काम करावे लागेल. जर एखाद्या कर्मचार्‍याला विप्रोच्या कामाव्यतिरिक्त काही करायचे असेल तर त्याला त्याच्या बिझनेस युनिट हेडकडून मंजुरी घ्यावी लागते. ही नोकरीची अनिवार्य अट आहे. सोशल मीडियावर या चर्चेला विप्रोच्या कार्यकारी अध्यक्षांनी चांगलीच हवा दिली होती. त्यांनी हे केवळ चुकीचेच नाही तर कंपनीची फसवणूक असल्याचेही म्हटले आहे.

 

टेक महिंद्रा (Tech Mahindra) :
टेक महिंद्राच्या एम्लॉयमेंट अ‍ॅग्रीमेंटनुसार, कंपनीच्या मंजूरीशिवाय इतर कोणतेही काम घेतल्यास नोटीस न देता नोकरीतून काढून टाकण्यात येऊ शकते.
मात्र, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीपी गुरनानी यांचे मत याबाबत बरेच उदारमतवादी आहे.
बिझनेस टुडेच्या नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले होते की, मला यात कोणतीही अडचण वाटत नाही.
याबाबत धोरण बनवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले होते.
गुरनानी यांच्या म्हणण्यानुसार, जर एखादा कर्मचारी त्याच्या वाट्याचे काम पूर्ण करत असेल तर तो आपली कमाई वाढवण्यासाठी इतर कामे करू शकतो, फक्त ते काम फ्रॉड असू नये.

एचसीएल टेक (HCL Tech) :
ही आयटी कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना इतर कोणतेही काम करण्यास मनाई करते.
कंपनीच्या करारामध्ये हे स्पष्टपणे नमूद केले आहे की जर एचसीएल टेकच्या कर्मचार्‍याने इतर
कोणत्याही कंपनी किंवा संस्थेसाठी कोणतेही काम केले तर त्याची नोकरी जाऊ शकते,
जरी ती कंपनी किंवा संस्था इतर कोणत्याही क्षेत्रातील असली तरीही. एचसीएल टेकने यास नोकरीसाठी अनिवार्य अट म्हटले आहे.

 

Web Title :- Moonlighting | it companies infosys tcs wipro appointment letters terms and conditions about moonlighting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | गोळीबार करुन 3.5 कोटी लुणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश, 1.43 कोटी रुपये जप्त

 

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन

 

e-Search Report Maharashtra | ऑनलाइन मिळकतींचा शोध (ई-सर्च रिपोर्ट) घेण्याची सुविधा पुन्हा सुरू