यंदा मान्सूनच्या सरी कमी बरसणार : स्कायमेट अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाचा मान्सून सरासरी पेक्षा कमी बरसणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याच्या हवामानाच्या प्रतिमानाच्या आधारे यंदा अल निनोचा प्रभावमुळे कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा अल निनोचा मान्सूनवर परिणाम होणार असल्याचेही स्कायमेटने म्हटले आहे. त्याचबरोबर दिल्लीतही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्याच्या हवामानाच्या प्रतिमानानुसार यंदा अल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये साधारण परिस्थितीहून कमी पाऊस पडू शकतो. मान्सूनबाबत मार्च महिन्याच्या अखेरिस किंवा एप्रिलमध्ये आणखी विस्तृत माहिती मिळण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलवात यांनी सांगितले. आत्ताच्या परिस्थितीनुसार जून-जुलैच्या आसपास मान्सूनमध्ये जास्त हालचाली दिसणार नाहीत. परंतु ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी राहण्याचे संकेत मिळत असल्याचेही पतवाल यांनी सांगितले.

इंडियन ओशन डाय पॉझिटिव्ह राहिल्यास साधारण परिस्थितीच्या आसपास पाऊस पडू शकतो. हा अल निनोचा परिणाम कमी करुन मान्सूनला सक्रिय करतो. आयओडीमध्ये अरबी समुद्र आणि हिंदी महासागरच्या समुद्राच्या स्थितीबाबत माहिती मिळते. जेव्हा अरबी सागर आणि हिंदी महासागराच्या सुमद्र सपाटीच्या तापमानात वाढ होते. तेव्हा त्याचे ढग बनतात आणि पाऊस पडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे मान्सून सक्रिय होतो.

इंडियन ओशन डाय पॉझिटिव्ह राहिल्यास साधारण परिस्थितीच्या आसपास पाऊस पडू शकतो. हा अल निनोचा परिणाम कमी करून मान्सूनला सक्रिय करतो. आयओडीमध्ये अरबी समुद्र आणि हिंदी महासागरच्या समुद्राच्या स्थितीबाबत माहिती मिळते. जेव्हा अरबी सागर आणि हिंदी महासागराच्या समुद्र सपाटीच्या तापमानात वाढ होते. तेव्हा त्याचे ढग बनतात आणि पाऊस पाडण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे मान्सून सक्रिय होतो.

https://twitter.com/SkymetWeather/status/1113359947931295745