MoPNG e-Seva | जर गॅस एजन्सी तुमच्याकडून घेत असेल भाडे वसूलीच्या नावाखाली जास्त पैसे, तर तात्काळ ‘या’ पध्दतीनं करा तक्रार, जाणून घ्या

नवी दिल्ली : MoPNG e-Seva | स्वयंपाकाच्या गॅसची किंमत प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य माणून हैराण झाला आहे त्यातच देशातील अनेक भागात गॅस एजन्सीवाले ग्राहकांकडून भाडे वसूल करण्याच्या नावाखाली जास्त दर आकारात (Gas Agency Charges) असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परंतु तुम्हाला सुद्धा असा अनुभव येत असेल तर ताबडतोब त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ एक ट्विट करायचे आहे. यानंतर गॅस सेक्टरची सोशल मीडिया टीम (MoPNG e-Seva) तुमच्या तक्रारीेचे निवारण करेल.

अलिकडेच एक असे प्रकरण समोर आले. एका ट्विटर यूजरने बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील एका गॅस एजन्सीद्वारे घेतल्या जात असलेल्या अतिरिक्त शुल्काबाबत तक्रार केली होती. यानंतर गॅस सेक्टरच्या सोशल मीडिया हेल्पने त्या तक्रारीवर माहिती घेतली.

 

 

ट्विटर यूजरने लिहिले – पंचदही गॅस एजन्सी, राजनगर, मधुबनी, बिहारद्वारे सर्व ग्राहकांकडून 35 ते
70 रूपये अतिरिक्त शुल्क भाडे वसूलीच्या नावाखाली घेत आहे आणि भाडे न दिल्यास सिलेंडर दिला जात नाही.

तक्रारीच्या उत्तरात MoPNG e-Seva ने ट्विट करत ग्राहकाला म्हटले की, तक्रार दाखल करण्यासाठी, कृपया आम्हाला कंपनीचे नाव (आयओसीएल, बीपीसीएल किंवा एचपीसीएल), 17 अंकांचा एलपीजी आयडी, ग्राहक क्रमांक, एजन्सीचे नाव, जिल्हा, ठिकाण आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर द्या, जेणेकरून आम्ही मदत करू शकतो.

सामान्यांना महागडा गॅस परवडेना

एका रिपोर्टनुसार चालू आर्थिक वर्ष (2021-22) च्या पहिल्या तिमाही (एप्रिल-जून) मध्ये उज्ज्वला
योजनेंतर्गत 3.2 कोटी कंझ्युमरने गॅस रिफील केला नाही. मागील एक वर्षात घरगुती गॅस सिलेंडरच्या
किमतीत 265 रुपयांची वाढ झाली आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे पोलिसांकडून RTI कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला आश्रय देणार्‍या पुण्यातील वकीलाला अटक

Kabul Airport | काबूल विमानतळाबाहेर 2 स्फोट; 70 जणांचा मृत्यू

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  MoPNG e-Seva | if the gas agency is charging you more price in the name of fare then complain like this immediately

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update