Indian Railways : आता दंड भरल्यानंतर सुद्धा ट्रेननं करता येणार नाही प्रवास, रेल्वेने जारी केली नवीन गाईड लाईन

मुरादाबाद : कोरोना संसर्ग वाढल्यानंतर रेल्वे सातत्याने गाईड लाईन जारी करत आहे. विना कन्फर्म तिकीटवाल्या प्रवाशांना रेल्वेत पूर्णपणे प्रतिबंध लावला आहे. वेटिंग तिकीट वाल्यांकडून दंड घेऊन त्यांना पुढील स्टेशनवर उतरवण्यात येईल. चेकिंग टीमला आदेश देण्यात आले आहे की, प्रवाशाकडून तिकिटाऐवजी त्याच्या मोबाईलमध्ये आलेला बारकोड स्कॅन करून चौकशी करावी.

देशभरात सातत्याने कोरोना संक्रमितांची संख्या वाढत चालली आहे. रेल्वे प्रशासन ट्रेनचे संचालन बंद करणार नाही. मात्र, रेल्वेतून प्रवास करणारे प्रवाशी आणि चेकिंग टीमच्या सुरक्षेसाठी गाईड लाईन जारी करण्यात आली आहे. रेल्वेने विना कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना पूर्णपणे ट्रेनमध्ये प्रवेशास प्रतिबंध लावला आहे. मार्चच्या अगोदर कोरोना संसर्ग कमी झाल्याने मॅन्युअल वेटिंग तिकिटवाले प्रवासी प्रवास करू लागले होते. ज्यांना कन्फर्म तिकिट मिळत नव्हते, ते ट्रेनमध्ये चढत होते आणि चेकिंग टीमला दंड देऊन इच्छित ठिकाणापर्यंत प्रवास करत होते.

रेल्वेच्या सध्याच्या गाईड लाईननुसार विना तिकिट किंवा वेटिंग तिकिट प्रवाशी पकडला गेल्यास त्याच्याकडून पुढील स्टेशनपर्यंतचे भाडे आणि दंड घेतला जाईल. यानंतर पुढील स्टेशनवर त्यास उतरवण्यात येईल. चेकिंग टीमला आदेश देण्यात आले आहेत की, मॅन्युअल आणि ई-तिकिट घेणार्‍या प्रवाशांच्या मोबाईलवर बारकोड येतो. प्रवाशांचे तिकीट पाहण्याऐवजी बारकोड स्कॅन करा, ज्यामुळे प्रवाशाची संपूर्ण माहिती चेकिंग टीमच्या मोबाईलवर येईल.

प्लॅटफार्मवर येण्यापूर्वी प्रवाशांची चौकशी केली जाईल. प्रवाशांना प्रवासादरम्यान मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि सॅनिटाइज करण्याबाबत माहिती दिली जात आहे. सहायक वाणिज्य व्यवस्थापक नरेश कुमार यांनी सांगितले की, कोरोनासाठी संबंधीत गाईड लाईन जारी होत आहे.