Morbi Bridge Collapse | मोरबी पूल दुर्घटनेत पोलिसांनी 9 जणांना घेतले ताब्यात

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरातमधील मच्छू नदीवरील (Machchhu River) मोरबी पूल (Morbi Bridge Collapse) रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेत 140 पेक्षा जास्त लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या मोरबी पूल (Morbi Bridge Collapse) दुर्घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 9 जणांना अटक केली आहे. पोलीस संबंधितांची कसून चौकशी करत आहेत.

या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रविवारी सायंकाळी दुर्घटना झाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (CM Bhupender Patel) आणि गृह राज्यमंत्री हर्ष सांघवी (Harsh Sanghavi) यांनी या ठिकाणी पाहणी करुन सूचना दिल्या. या दुर्घटनेत पूलाची देखभाल करणाऱ्या खासगी संस्थेच्या विरोधात कलम 304, 308 आणि 114 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुजरात सरकारने (Gujarat Government) या दुर्घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी (Special Investigation Team) स्थापन केली आहे.

या पूलाला झुलता पूल असे देखील संबोधले जाई. गुजरातमधून वाहणाऱ्या मच्छू नदीवर हा पूल आहे.
हा पूल बांधकाम आणि दुरुस्तीसाठी मागील सात महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला होता. 26 ऑक्टोबर रोजी गुजराती नवीन वर्षाच्या (Gujarati New Year Day) मुहूर्तावर हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. परंतु या पूलासाठी महानगरपालिकेने कोणतेही फिटनेस प्रमाणपत्र (Fitness Certificate) दिले नव्हते. त्यामुळे या पूलाच्या बांधकामात त्रुटी राहिल्याने हा पूल पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title :- Morbi Bridge Collapse | police action in morbi bridge collapse case 9 people were detained

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा