Coronavirus : दिल्ली अन् मुंबईत ‘कोरोना’चे सर्वाधिक रूग्ण, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं ‘हे’ कारण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणतात की, दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये लोक लॉकडाऊनचे पालन योग्य प्रकारे करत नाहीत. त्यांच्या मते, या कारणामुळेच शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ते असेही म्हणाले की, भारतातील ग्रामीण भागातील लोक लॉकडाऊनचे योग्य प्रकारे पालन करत आहेत.

ग्रामीण भागात जास्त गंभीरता
डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, ‘मला वाटते कि दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये लोक लॉकडाऊनचे योग्य प्रकारे पालन करत नाहीत. लॉकडाऊनबाबत ग्रामीण भागातील लोक अधिक गंभीर आहेत.

दोन्ही शहरात सतत वाढत आहेत प्रकरणे
देशभरात कोरोनाचे २० टक्के रुग्ण मुंबईचे आहेत. मुंबईत ८६१३ लोकांना कोरोनाची लागण झाली असून ३४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनाचे आतापर्यंत ४५४९ रुग्ण आढळले असून रविवारी येथे विक्रमी ४२७ नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

मात्र, डॉ हर्ष वर्धन यांचे म्हणणे आहे की या दोन शहरांमध्ये रूग्णांची संख्या जास्त आहे कारण परदेशातून परत येणारे सार्वधिक लोक इथेच पोहोचले. ते म्हणाले, ‘दिल्ली आणि मुंबईमध्ये मोठ्या संख्येने लोक झोपडपट्टी परिसरात राहतात, अशात येथे लॉकडाऊन लागू करणे सोपे नाही.’

आतापर्यंत १० लाखपेक्षा जास्त टेस्ट
आरोग्यमंत्र्यांनी ग्रामीण भागाचे कौतुक करत सांगितले की, लॉकडाऊनचे योग्य प्रकारे पालन केले जात आहे. प्रवासी मजुरांकडून फारसा धोका नाही, कारण परदेशातून परत आलेल्या लोकांशी त्यांचा संपर्क झालेला नाही, असेही ते म्हणाले. तसेच भारतात आतापर्यंत १० लाखाहून अधिक लोकांची चाचणी घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. चांगली गोष्ट अशी आहे की, इतर देशांपेक्षा येथे अधिक रुग्ण आढळत नाहीत.

येत्या काही दिवसांत देशभरात एक लाख चाचण्या केल्या जातील, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. कोरोनाची लक्षणे असलेल्यांची टेस्ट केली जाईल.