नाशिकमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे; तुकाराम मुंढेंचा गौप्यस्फोट 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

नाशिक महापालिकेत नोंद असलेल्या एकूण ३ लाख २७ हजार मिळकतींपैकी तब्बल २ लाख ६९ हजार मिळकतींमध्ये अतिरिक्त बांधकाम आढळून आले आहे. त्यामुळे या मिळकती अनधिकृ असल्याचा गौप्यस्फोट आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. या मिळकती अनधिकृत ठरल्याने मिळकतधारकांकडून तीन पट दंडासहित घरपट्टी वसुली केली जाणार आहे. या मिळकतींच्या भानगडीत तुम्ही हस्तक्षेप करू नका, असेही मुंढेंनी स्थायी समितीला सुनावले आहे.

मंत्रिमंडळ विस्तार : नवरात्रौत्सवात खडसेंना देवी पावणार?

स्थायी समितीच्या झालेल्या सभेत शेती क्षेत्रावरील करवाढ अन्यायकारक असल्याचा मुद्दा उपस्थित करीत सभागृहनेते तथा समितीचे सदस्य दिनकर पाटील यांनी वर्षानुवर्षे कराच्या टप्प्यात नसलेल्या मिळकतींकडून करवसुली करण्याची सूचना मांडली. यावर आयुक्त मुंढे यांनी सभागृहासमोर मिळकत सर्वेक्षणातून आढळलेली माहिती सांगितली. या माहितीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

[amazon_link asins=’B019MQLYUW,B076H51BL9,B06XKF5PG4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17ad2347-be25-11e8-a7ce-0786335bd4af’]

महापालिकेच्या माध्यमातून नुकतेच मिळकत सर्वेक्षण करण्यात आले असून, या सर्वेक्षणातून करात नसलेल्या सुमारे ६२ हजार नव्या मिळकती आढळून आल्या आहेत. या मिळकतींवर नव्या दराने सहा वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने घरपट्टीची आकारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी या मिळकतींना विशेष नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, दंडात्मक रकमेसह ऑक्टोबरअखेरपासून प्रत्यक्ष करवसुलीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे महापालिका घरपट्टी सदरी ३ लाख २७ हजार मिळकतींची नोंद आहे. मात्र, मिळकत सर्वेक्षण करताना यापैकी २ लाख ६९ हजार मिळकतींमध्ये प्रत्यक्ष मंजूर क्षेत्रापेक्षा अतिरिक्त अनधिकृत बांधकाम झाल्याचे सर्वेक्षणातून आढळून आल्याचे मुंढे यांनी सांगितले.

सर्जिकल स्ट्राइकचा वर्धापन दिन वादात, सक्ती नसल्याचे जावडेकरांचे स्पष्टीकरण

विशेष म्हणजे १ लाख २६ हजार मिळकतींमध्ये ३० चौरस मीटर क्षेत्रापेक्षाही अधिक अनधिकृत बांधकाम झाले आहे. अनेक मिळकतींमध्ये विनापरवाना परस्पर वापरात बदल करण्यात आल्याचे आढळले आहे. त्यामुळे अशा मिळकतधारकांकडून तीन पट दंडासहित घरपट्टी वसूल केली जाणार आहे, असे आयुक्त मुंढे यांनी म्हटले आहे. मुंढे यांच्या या पवित्र्यामुळे पुन्हा एकदा नाशिक महापालिकेतील सत्ताधारी विरूद्ध मुंढे असे वाद रंगण्याची शक्यता आहे.