‘तुझ्याकडे स्टॉक आहे ?’; सामोरे आले नवीन ड्रग चॅट्स , N-D-K नावाच्या टॉप बॉलिवूड अभिनेत्रींचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा किती वापर केला जातो किंवा अभिनेता-अभिनेत्री कोणत्या प्रमाणात ड्रग्समध्ये मग्न आहेत, याविषयी आजकाल नवे खुलासे केले जात आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूवर ड्रग अँगल समोर आला. अनेक ड्रॅग चॅट समोर आले, ज्यामुळे बरेच मोठे खुलासे झाले. रिया चक्रवर्तीला तुरुंगात जावे लागले. आता नवीन ड्रग चॅट्स समोर आले आहेत, ज्यामुळे बॉलिवूडमधील अनेक स्टार अडचणीत येऊ शकतात.

नवीन ड्रग चॅटमध्ये ज्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे आहेत, ती S, N, D, K सुरू होतात. ते सर्व ड्रग्सबाबत व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करतात. एका अभिनेत्रीचे नाव N पासून सुरू होते, तर दुसर्‍या अभिनेत्रीचे नाव K ने सुरु होते. समोर आलेल्या चॅटमध्ये N आणि J ला सांगितले, मला काही चांगले एमडी द्या. D ने K ला विचारले तुझ्याकडे ‘माल’ आहे का? K ने उत्तर दिले की, आहे पण घरी आहे. मी वांद्रे मध्ये आहे.’ या नवीन व्हॉट्सॲप चॅटमधून बॉलिवूडच्या 5 टॉप सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. K, D, S, N हे सर्व ए-लिस्ट कलाकार आहेत.

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ड्रॅग अँगलची चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) सोमवारी अभिनेत्याची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी आणि त्याची टॅलेंट मॅनेजर जया साहाला चौकशीसाठी बोलावले. या चौकशीतून बॉलिवूडमधील ड्रग्जच्या अनेक बाबी उघडकीस येऊ शकतात. जया साहा यांच्या फोनवरून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की बॉलिवूड स्टार्स त्यांना CBD तेल आणि ड्रग्ज पुरवण्यास सांगायचे. जया साहाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी भाग आहेत. रिया चक्रवर्तीनंतर जया साहा बी-टाउन कार्टेलचा एक महत्त्वाचा दुवा आहे. एनसीबीला स्त्रोत जाणून घ्यायचा आहे की, जेथून जया सेलिब्रिटींसाठी सीबीडी तेलाची व्यवस्था करीत असत. एजन्सी जया साहाला एसएलबी आणि अमितच्या नावाबद्दलही विचारत आहे, ज्यांचा चॅटमध्ये उल्लेख आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like