अटल महंगाई, अटल भ्रष्टाचार : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

सर्व पक्षातील भ्रष्ट लोकांना घेऊन पक्ष वाढविण्याचे काम करणाऱ्या भाजपचे अनेक मंत्र्यांच्या कारभारामुळे भाजपची गंगा मैली झाली आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे गृहनिर्माण घोटाळे अधिवेशनात काढण्यात आले होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यापासून ते सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यापर्यंत अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येऊनही त्यांना संरक्षण देण्याचे काम सरकारने केले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’04b66089-c850-11e8-b15c-cb94f8de598f’]

तर दुसरीकडे मोठ्याप्रमाणात वाढलेल्या महागाईने जनता त्रस्त आहे. अटल भाजपची घोषणा भाजपने दिली असली तरी त्या ऐवजी अटल महेंगाई- अटल भ्रष्टाचार हेच आजचे वास्तव चित्र आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

‘त्या’ प्रकरणात धनंजय मुंडे यांना काेर्टाकडून दिलासा

धनंजय मुंडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्यातील मंत्र्यांच्या पाच चांगल्या कामांचे प्रगतिपुस्तक तयार करण्यात मग्न असले तरी परिस्थिती नेमकी उलटी आहे. मंत्री व मंत्रालयातील भ्रष्टाचारामुळे लोक त्रस्त आहेत. आश्वासनांची अनेक गाजरे गेल्या चार वर्षांत दाखविली. खड्डेमुक्त रस्त्यांपासून कर्जमाफीपर्यंत अनेक घोषणा झाल्या. मात्र लोकांना अच्छे दिन दिसलेच नाहीत. उलट मंत्रालयाच्या दारापर्यंत आत्महत्यांचे सत्र पोहोचले. येत्या हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांच्या किमान पाच भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची पुस्तिकाच राष्ट्रवादी पक्षाकडून प्रसिद्ध येणार आहे, असेही मुंडे यांनी जाहीर केले. पनवेल येथील कोयना धरणग्रस्तांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याच्या घोटाळ्यापासून नगरविकास विभागातील अनेक प्रकरणे आगामी अधिवेशनात पुस्तिकेच्या माध्यमातून आम्ही प्रसिद्ध करू, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’8176567523′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0e0d6e28-c850-11e8-af9b-bd230a54133b’]