आषाढी वारीसाठी देहूनगरी गजबजू लागली….

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन 

जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा ३३३ व्या आषाढी सोहळा अवघ्या काही तासंवर आलेला आहे. गुरुवारी प्रस्थान होणाऱ्या वारीत सहभागी होण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांमुळे देहूनगरी गजबजू लागली आहे. या ठिकाणची पालखी प्रस्थानाची तयारी पूर्ण झालेली असून पोलिस व इतर प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या मुख्य कार्यक्रमाला गुरुवारी दुपारी अडीच वाजता प्रारंभ होणार आहे.

पालखी सोहळा

राज्यात मान्सूनचे वेळेत आगमन झाल्यामुळे वारकरी आनंदित झाले आहेत. अधिक महिन्यामुळे यंदा आषाढी वारी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. त्यानुसार देहूत भाविकांची गर्दी वाढली आहे. आभाळातून बरसणाऱ्या पावसाच्या सरी अन् टाळमृदंगातून उमटणाऱ्या भक्तीच्या लहरी यामुळे वातावरणात अनोखा रंग भरला आहे. धर्मशाळा आणि इंद्रायणी काठच्या राहुट्यांमधून भजन-किर्तनाची सुरावट ऐकू येत आहे. ‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोषाने तीर्थक्षेत्र दुमदुमून गेल आहे.

[amazon_link asins=’B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’81789f0f-7ebb-11e8-af59-754f9dd7f24b’]

‘परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. त्यानुसार देहूतील मुख्य मंदिरात पहाटे साडेचार वाजता काकड आरती होणार आहे. त्यानंतर काल्याचे कीर्तन होईल. इनामदार वाड्यातून दुपारी साडेबारा वाजता पादुका मुख्य मंदिरात आणण्यात येणार आहेत. त्यानंतर अडीच वाजता प्रस्थान कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. पालखी सोहळ्याचे यंदाचे 333 वे वर्ष आहे. यामध्ये 331 दिंड्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यंदा पावसाचे वेळेत आगमन झाल्यामुळे वारकरी आनंदात आहेत, ’ त्यामुळे सुमारे चार ते पाच लाख वारकरी सहभागी होतील असे पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b873c64-7ebb-11e8-9b95-fddb43d5472e’]

जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा ३३३ व्या आषाढी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. या सोहळ्यासाठी देहुगाव येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलायं.  पोलीस उपअधिक्षक जी.एस.माडगुळकर यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी देहूरोडचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस, लोणावळ्याचे अमरनाथ वाघमोडे उपस्थित होते.

गुरुवारी (दि.५ जुलै) रोजी तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. लाखो भाविक सहभागी होणाऱ्या या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेल्या आहे. यासाठी अधिक्षक हक, उपाधिक्षक सातपुते, डीवायएसपी माडगूळकर यांच्यासह सात निरीक्षक, २२ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, २७० महिला पुरुष पोलिस कर्मचारी आणि १५० होमगार्ड असणार आहेत. या सोबत एसआरपीएफ, दंगा काबू नियंत्रण पथक व इतरही पथके तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक जी.एस.माडगुळकर यांनी दिली.

संबंधीत बातम्या
पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल

पालखी सोहळा कालावधीत ठरावीक मार्गावरील वाहतूकीत बदल