पैशांची ‘तात्काळ’ घेवाण-देवाण करण्यासाठी OTP सह तुम्हाला ‘चेहरा’ देखील दाखवावा लागेल, जाणून घ्या ‘या’ नव्या ‘सर्व्हिस’बद्दल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ऑनलाइन बँकिंग व्यवहारासाठी (Online Banking Transaction) आता केवळ एक ओटीपी (OTP) चालणार नसून ऑनलाइन बँकिंग अधिक सुरक्षित करण्यासाठी अजून नवी फीचर्स जोडली जाऊ शकतात. ऑनलाईन बँकिंग व्यवहारावेळी ओटीपी (OTP) व्यतिरिक्त आता चेहऱ्याची ओळख (Facial Recognition), आइरिस (Iris) आणि स्थान (Location) मागितले जाऊ शकते, त्यानंतरच व्यवहार पूर्ण होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅंकिंग फ्रॉड (Banking Fraud) ला आळा बसण्यासाठी रिझर्व्ह बँक (RBI) या प्रस्तावावर विचार करीत आहे.

ही फीचर्स जोडली जाणार-
ऑनलाईन बँकिंग व्यवहारात नवीन फीचर्स जोडली जातील. यामध्ये ओटीपीसह चेहऱ्यावरील ओळख, स्थान देखील जोडले जाईल. यानंतरच ऑनलाइन व्यवहार पूर्ण होईल. फेस, आयरिस आणि स्थान यासारख्या सुरक्षित वैशिष्ट्यांचा देखील समावेश केला जाणार आहे. सध्याला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) चा वापर होत आहे. याद्वारे व्यवहार 3D पिन व OTP ने पूर्ण होतात. गेल्या वर्षी बँकिंग घोटाळ्याची रक्कम 71,543 कोटी रुपये होती, तर मागील तिमाहीत 8,926 इतक्या घोटाळ्याची नोंद समोर आली आहे.

2 एफए म्हणजे काय?-
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर डेबिट किंवा क्रेडिट कार्डसह व्यवहारांमध्ये दोन सुरक्षा स्तर असतात. याला द्वि-घटक प्रमाणीकरण म्हणतात. पहिल्या स्तरात ग्राहकाला कार्ड व सीव्हीव्ही इत्यादीचा तपशील घेऊन व्यवहारास मान्यता दिली जाते आणि दुसर्‍या स्तरात ग्राहकाला ओटीपी देण्यास सांगितले जाते, जो की ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर पाठवला जातो. व्हिसा कंपनीचे मत आहे की सर्व व्यवहारांमध्ये ते आवश्यक नाही.

बँकिंग घोटाळ्यामुळे 18 सरकारी बँकांकडून सुमारे 1.17 लाख कोटींचे नुकसान-
ऑनलाईन बँकिंग घोटाळ्यामुळे 18 सरकारी बँकांकडून सुमारे 1.17 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. डिजिटल व्यवहार दरवर्षी 13% च्या दराने वाढत आहेत, तर मोबाइल वॉलेट्समध्ये सुमारे 53% वाढ अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑनलाइन बँकिंग घोटाळ्यांवर अधिक कठोर उपाययोजना करण्याच्या विचारात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like