बीड महामार्ग पोलिसांकडून 1 कोटीचा गुटखा जप्त

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड महामार्ग पोलिसांनी आज (शनिवारी) तब्बल 1 कोटी रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनास देखील कळविण्यात आले होते.

महामार्ग पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली होती की, मांजरसुंबा घाटाच्या वर हॉटेल तुळजाई समोर एक कंटेनर रस्त्याच्या बाजूला थांबला असून त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. त्या कंटेनरमधून सुगंधित तंबाखू आणि गुटख्या सारखा वास येत आहे. बातमीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. त्या कंटेनरमध्ये 1 कोटीचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू आढळून आली.

पो.उपनिरिक्षक गिते यांच्या सोबत पो.ह. 886 विजय जाधवर, गणेश दुधाळ, पो.ना 186 अनिल तांदळे, विलास ठोंबरे, अशोक सोनवणे, मारुती म्हैत्रे, लक्ष्मण मुंडे, भागवत बिक्कड , पो. काँ. सुदाम वनवे, विकास थोरात, फुलचंद जाधव, अल्ताफ शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. अन्न व भेसळ प्रशासन सह आयुक्त दाभाडे यांनी त्याचे विरुध्द पो.स्टे. नेकनुर येथे कायदेशीर फिर्याद देणे चालू आहे.