म्यानमारमधील भीषण दुर्घटनेत 100 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – म्यानमारमध्ये एक भीषण अपघात झाला असून तेथील जेड माईनमध्ये भूस्खलनामुळे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर म्यानमारमध्ये भूस्खलनानंतर गुरुवारी किमान १०० जेड खाण कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

एका वृत्तसंस्थेनुसार, काचिन राज्यात चीनच्या सीमेजवळ मुसळधार पाऊस झाल्यानंतर म्यानमारच्या अग्निशमन सेवा विभागाने झालेल्या अपघाताबद्दल एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, काचीन राज्यातील जेड-समृद्ध हापकांत भागात कामगार दगड जमा करत होते. तेथे खाण घसरल्यामुळे भूस्खलन होऊन खनिकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ११३ मृतदेह काढण्यात आले आहेत.

बचाव पथकाचे म्हणणे आहे की, या भागात मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर चिखलाची एक मोठी लाट लहरीप्रमाणे आली आणि त्याखाली दगड गोळा करणारे लोक दबले गेले. हापकांतच्या खराब नियमीत खाणींमध्ये प्राणघातक भूस्खलन आणि इतर अपघात सामान्य आहेत.

अपघाताचे साक्षीदार असलेल्या परिसरातील ३८ वर्षीय मून खैन्ग यांनी सांगितले की, त्यांनी कचऱ्याचा ढीग पाहिला, जो कोसळण्याच्या मार्गावर होता आणि जेव्हा ते एक फोटो घेणार होते तेव्हा लोक पळण्यासाठी आरडाओरडा करू लागले. त्यांनी सांगितले की एका मिनिटातच सर्वजण त्याच्या खाली आले. तेथे चिखलात अडकलेले लोक मदतीसाठी ओरडत होते, पण कोणीही त्यांना मदत करु शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर अनेक कामगार अजूनही त्याखाली अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचाव पथके मृतदेह बाहेर काढत आहेत. मात्र मुसळधार पाऊस असल्यामुळे मदत आणि बचाव दलांनाही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like