वाराणसीत मोदींच्या विरोधात १११ शेतकरी लढवणार निवडणूक

तिरुचिरापल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – दिल्लीत आपल्या मागणीसाठी आंदोलन करूनदेखील भाजप सरकारने आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. म्हणून तामिळनाडू राज्यातील १११ शेतकरी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. तामिळनाडू राज्यातील १११ शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे तामिळनाडूचे शेतकरी नेते पी. अय्याकन्नू यांनी म्हणले आहे.

भाजपने २०१४ च्या जाहीरनाम्यात शेतमालाला योग्य भाव देण्यात येईल असे म्हणले होत. मात्र, त्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळेच शेतकरी निवडणूकीच्या आखाड्यात उतरले आहेत, असे पी. अय्याकन्नू म्हणाले आहेत. तर आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे नरेंद्र मोदी यांनी लेखी आश्वासन देताच आम्ही आमचे उमेदवाऱ्या मागे घेऊ असे अय्याकन्नू यांनी म्हणले आहेत. जर मोदींनी आम्हाला लेखी आश्वासन दिले नाही तर आम्ही सर्व शेतकरी नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढणार आहे असेही अय्याकन्नू यांनी म्हटले आहे.

अय्याकन्नू यांच्या नेतृत्वाखाली २०१७ मध्ये दिल्लीत तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी १००हुन अधिक दिवस आंदोलन केले होते. काँग्रेसनेही या मुद्द्याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केला नाही. मग त्यांच्या नेत्यांच्या विरोधात का निवडणूक लढत नाही असा प्रश्न विचारताच अय्याकन्नू म्हणाले की, भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे आणि त्यांनी सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांना या संदर्भात आश्वासने देण्यात आली होती. त्यांनी आश्वासने पूर्ण केली नाहीत म्हटल्यावर आम्ही त्यांचाच विरोध करणार आहोत.