‘या’ निर्मात्यावर 100 हून अधिक महिलांनी केले लैंगिक अत्याचाराचे आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- हॉलिवूड प्रोड्युसरवर एकाच वेळी अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे तो सध्या चर्चेत आला आहे. हॉलिवूड प्रोड्युसर हार्वे वीनस्टीन त्याचा आधीच्या फिल्म स्टुडिओचे बोर्ड मेंबर्स, आरोप लावणारी महिला आणि न्ययॉर्क अटोर्नी जनरल ऑफिस यांच्यात या केसबाबत चर्चा झाली आहे. असे समजत आहे की, त्यांनी त्यांच्या आधीच्या स्टुडिओ बोर्ड मेंबर्सने तब्बल 44 मिलियन्स डॉलर म्हणजेच जवळ जवळ 306 कोटी रुपयात आपल्यावरील हटवण्यासाठी हात मिळवला आहे.

अशी चर्चा सुरु आहे की, जर ही डील झाली तर हार्वेवर लावण्यात आलेले लैंगिक अत्याचाराचे आरोप लवकरच संपुष्टात येतील. तुम्हाला सांगू इच्छितो की, काही महिन्यांपूर्वीच ग्रँड ज्यूरीने वीनस्टीनवर दुष्कर्म आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. इतकेच नाही तर, वीनस्टीनवर हॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींनी समवेत 100 हून अधिक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की, #meetoo या चळवळीतून काही महिलांनीही आपले म्हणणे मांडत त्यांच्या विरुद्ध लिहले होते. त्यानंतर हे चळवळ जगभरात पोहोचली.

ही चळवळ बॉलिवूडमध्येही सुरु झाली तेव्हा बॉलिवूडमधील देखील अनेक दिग्गज चेहऱ्यांवर आरोप होताना दिसून आले. यात काही दिग्दर्शकांचाही समावेश होता.